Mon, Apr 22, 2019 15:56होमपेज › Marathwada › बीड : दोन भावंडांचा विहिरीत बुडून मृत्यू 

बीड : दोन भावंडांचा विहिरीत बुडून मृत्यू 

Published On: Apr 29 2018 8:47PM | Last Updated: Apr 29 2018 8:47PMअंबाजोगाई :प्रतिनिधी

अंबाजोगाई तालुक्यातील अकोला येथील दोन चुलत भावाचा पोहत असताना बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना रविवारी दि. २९ रोजी साडेतीनच्या दरम्यान घडली. ज्ञानेश्वर महादेव आगळे व परमेश्वर हनुमंत आगळे अशी बुडून मृत्यू झालेल्या दोन चुलत भावांची नावे आहेत. तर सिद्धेश्वर बालाजी आगळे (वय १५) यास वाचविण्यात यश मिळाले.  

अंबाजोगाई तालुक्यातील अकोला गावचे रहिवासी असलेले ज्ञानेश्वर महादेव आगळे (वय १९) व त्याचा चुलत भाऊ परमेश्वर हनुमंत आगळे (वय १८) हे दोघे लातूर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. दोन्ही  भावंडाचे वडील शेती व्यवसाय करतात. दोन दिवसापूर्वी  गावी अकोला येथे विवाह समारंभानिमित्त आले होते. रविवारी दि. २९ एप्रिल रोजी तिघे चुलत भावंडे शेतातील विहिरीत पोहण्यासाठी म्हणून गेले. तिघांनाही पोहता येत नव्हते. पोहण्यासाठी विहिरीत उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्यात उडी मारल्यानंतर ते दोघे वर आलेच नाहीत हे पाहून सिद्धेश्वर आगळे याने आरडाओरड केली. त्यानंतर शेतातील ग्रामस्‍थ घटनास्‍थळी आले मात्र तोपर्यंत ते बुडाले होते. सिद्धेश्वर आगळे याच्यावर उपचार करण्यात आले असून त्याची तब्येत ठिक आहे. परमेश्वर व ज्ञानेश्वर हे दोघेही पुणे येथे नीटची परीक्षा देण्यासाठी जाणार होते.निसर्गाने आयुष्य घडविण्या अगोदरच त्यांच्यावर घाला घातला.