Thu, Jun 27, 2019 02:21होमपेज › Marathwada › महानुभाव पंथाचे दोन ठराव कॅबिनेटमध्ये मांडणार

महानुभाव पंथाचे दोन ठराव कॅबिनेटमध्ये मांडणार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

परभणी : प्रतिनिधी

महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींनी मराठीचा आद्यचरित्रग्रंथ अमरावती जिल्ह्यातील रिद्धीपूर येथे लिहिला त्या ठिकाणी मराठी साहित्य विद्यापीठाची निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे. आठशे वर्षांपूर्वीचे तीर्थक्षेत्र असून देवस्थानचा दर्जा मिळाला नाही. तो मिळावा, पर्यटन दर्जा मिळावा यासाठीही सातत्याने प्रयत्न केला जाणार आहे. असे महत्त्वाचे दोन ठराव कॅबिनेटमध्ये मांडून संमत करण्यात येतील, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.

असोला येथे अखिल भारतीय महानुभाव संत संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून चिरडे बाबा उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष मकर धोकडा निवासी न्यायंबासबाबा शास्त्री, कार्याध्यक्ष रनईचे मोठे बाबा, आ. डॉ. राहुल पाटील, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, विठ्ठलराव रबदडे, आ. रामराव वडकुते, मराठा सेवा संघाचे कार्यकारिणी सदस्य प्रा. अनंतराव शिंदे, रत्नाकर गुट्टे, रविराव देशमुख, आप्पासाहेब पाटील, विलास मोहिते, नंदकुमार पाटील, सुभाषराव जावळे, बीडकरबाबा शास्त्री, लासूरकरबाबा, शेवलीकर बाबा, तेल्हारकर बाबा, नागराज बाबा, राहेरकर बाबा, कापूसतळणीकर बाबा, सुभद्राबाई आत्या, कारजेकर बाबा, लोणारकर बाबा, भोजनेबाबा, बाबूलकर बाबा शास्त्री, दुतोंडे बाबा, राजघर बाबा, माहूरकर बाबा, सरळ बाबा आदी उपस्थित होते. मंत्री जानकर म्हणाले की, मराठी भाषेच्या साहित्याला 800 वर्षांपासूनचा इतिहास आहे.

महानुभाव पंथांचे मोठे योगदान आहे आणि येथील संतांचे विचार आणि ठराव दोन दिवसांनंतर होणार्‍या कॅबिनेटमध्ये मांडून मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न करू. आठशे वर्षांपूर्वी व त्यानंतरही महानुभाव पंथ हा धर्मप्रेरित असल्याचे सांगितले.  प्रास्ताविक महंत दुधगावकर बाबा यांनी केले. संमेलन यशस्वीतेसाठी महानुभावपंथीय बांधवांनी परिश्रम घेतले.


  •