Wed, Jan 16, 2019 17:34होमपेज › Marathwada › ‘वैद्यनाथ’ दुर्घटनेतील दोघांचा मृत्यू; सहाजण चिंताजनक 

‘वैद्यनाथ’ दुर्घटनेतील दोघांचा मृत्यू; सहाजण चिंताजनक 

Published On: Dec 09 2017 9:41AM | Last Updated: Dec 09 2017 9:41AM

बुकमार्क करा

बीड : प्रतिनिधी

‍परळीजवळील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील रसाची टाकी फुटून १२ कर्मचारी भाजल्याची दुर्दैवी घटना काल(शुक्रवार दि.०८)  घडली होती. यापैकी दोन कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सहा जणांची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे.

मधुकर पंढरीनाथ आदनाक (वय ५०) आणि सुभाष गोपीनाथ कराड (वय ४५) अशी मयात कर्मचाऱ्यांची नावे आहेत. अचानक वाफेचा दाब वाढल्याने इव्हॅपोरेटरच्या खालच्या बाजूचा जोड दुभंगून आतील रस बाहेर पडला. १२० डिग्री सेल्सिअस पेक्षाही अधिक तप्त उकळता रस आणि वाफेचे मिश्रण वेगाने रस अंगावर पडून १२ जण जखमी झाले होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून सहा जणांची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे.

या दुघटनेतील जखमींवर लातूर येथील लहाने हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. यातील सर्वाधिक कर्मचारी परळी तालुक्यातील असल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे.