Tue, Apr 23, 2019 20:21होमपेज › Marathwada › तुती लागवडीची दीड लाख रोपे केली तयार 

तुती लागवडीची दीड लाख रोपे केली तयार 

Published On: May 10 2018 1:37AM | Last Updated: May 09 2018 10:26PMमानवत : मोहन बारहाते

परंपरागत शेती व्यवसाय डबघाईला आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. बोंडअळीने तर शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले  आहे, अशा परिस्थितीत कापूस पिकांपासून फारकत घेत परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील कोल्हावाडी येथील 32 शेतकर्‍यांनी एकत्र येऊन रेशीम उत्पादक शेतकरी गटाची स्थापना केली आहे. यात तुती व्यवसाय निवडला असून त्यासाठी प्रत्येक शेतकर्‍याने स्वतःच्या शेतात तुती रोपवाटिका तयार करून दीड लाख रोपांची निर्मिती केली आहे. येत्या जून महिन्यामध्ये ही तुतीची लागवड केली जाणार आहे.

यावर्षी बोंडअळीने तर कापूस उत्पादक शेतकर्‍याचे कंबरडे मोडले गेले. सोयाबीनला योग्य भाव मिळाला नाही. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांची आणखी चिंता वाढली. येत्या खरीप हंगामात कापूस पीक घेण्याची मनःस्थितीत शेतकरी दिसत नाहीत. नवीन काहीतरी करण्याच्या उद्देशाने कोल्हावाडी येथील तरुण शेतकरी एकत्र येऊन यात 32 शेतकर्‍यांचा रेशीम उत्पादक शेतकरी गट तयार केला.नरेगा योजनेंतर्गत महारेशीम नोंदणी अभियान 2018-19 साठी नोंदणी केली. नोंदणी झाल्यानंतर जिल्हा रेशीम कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली फेब्रुवारी 2018 मध्ये सर्वच 32 शेतकर्‍यांनी स्वतः च्या शेतात एक एकर तुतीची लागवड करण्यासाठी 5 हजार 500 रोपांची रोपवाटिका तयार केली.सध्या शेतकरी समूहगट तुती लागवडीसाठी तयार करण्यात आलेल्या रोपवाटिकांची जोपासना करत आहे. यत्याचबरोबर तुती लागवडीसाठी शेताची मशागत करत आहे. 32 शेतकर्‍यांकडे 1 लाख 60 हजार तुतीचे रोप तयार झाले आहे.