होमपेज › Marathwada › तुरीला आले अच्छे दिन 

तुरीला आले अच्छे दिन 

Published On: Feb 02 2018 1:34AM | Last Updated: Feb 01 2018 10:03PMबीड/अंबाजोगाई:  प्रतिनिधी

राज्य सरकारने हमीभावाने गुरुवारपासून तुरीची खरेदी सुरु केली असून बीड जिल्ह्यात बारा खरेदीकेंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. गुरुवारी माजलगाव व अंबाजोगाई येथे तुर खरेदी केंद्र सुरु करण्यात आली. जिल्हाभरात बारा ठिकाणी उद्यापासून तुर खरेदी करण्यात येणार आहे.

गेल्यावर्षी तुर खरेदी वेळी शेतकर्‍यांची फजिती झाली होती प्रशासनाकडून तुरी ठेवण्यासाठी गोदाम तसेच बारदाना उपलब्ध नव्हता त्याचप्रमाणे शेतकर्‍यांनी विक्रीसाठी तूर कधी न्यायची याबद्दल कुठलेच नियोजन करण्यात आले होते त्यामुळे तुरीच्या खरेदीबाबत शासनाच्या नियोजनावरही शेतकर्‍यांनी आगपाखड केली होती. गतवर्षीचे अनुभव पाहून शासनाने यावर्षी अधिक बदल केले आहेत शासनाने या वेळी तुरीला पाच हजार 200 रुपये प्रतिक्विंटल दर अडीचशे रुपये बोनस जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे शेतकर्‍यांना 5 हजार 450 रुपये हमी भाव मिळणार आहे. दरम्यान तुरीच्या जराशीही पूर्ण झाले आहेत रंतु शासनाची खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकर्‍यांनी बाजारपेठेकडे मोर्चा वळविला होता. हमीभावापेक्षा मोंढा बाजारात दीड हजार रुपये कमी भावाने तुर खरेदी केली जात होती खरेदी केंद्र सुरू केले गेल्याने आता शेतकर्‍यांना योग्य भाव मिळणार आहे.

 बाजार समिती मार्केटिंग फेडरेशन खरेदी-विक्री संघाच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन खरेदी केंद्र लवकर सुरू करण्याच्या कार्यवाहीला गती देण्यासाठी जिल्हा मार्केटिंग अधिकारी लक्ष ठेवून आहेत. बाजार समितीशी संपर्क साधून तुर खरेदी साठी आवश्यक असणारे  ताडपत्री, वजन काटा,आर्द्रता मापक यंत्र, हमाल चाळणी आदी बाबी उपलब्ध करून घेण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.

शेतकर्‍यांनी हमी केंद्रावर तुर घेऊन येत असताना सोबत ओळखपत्र आधार कार्ड बँकेच्या पासबुकची झेरॉक्स सातबारा सोबत आणावा.
 ःएस.के.पांडव, जिल्हा मार्केटिंग अधिकारी बीड