माजलगाव : सुभाष नाकलगावकर
शासनाकडून मागील दोन महिन्यांपूर्वी तूर खरेदी केंद्र येथील खरेदी विक्री संघाच्या मार्फत चालू करण्यात आले होते, परंतु अपुरे मनुष्य बळ व नियोजन शून्य कारभारामुळे येणार्या अडचणी पाहता उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीकडे वर्ग करण्यात आले असून एक महिन्यानंतर तूर खरेदीस सुरुवात झाली आहे.
शासनाने नाफेड मार्फत जागोजागी शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. त्यानुसार खरेदी विक्री संघ माजलगाव यांनी 1 फेब्रुवारी पासून टीएमसीच्या आवारात तुरीची खरेदी केंद्र सुरू झाले होते. सुरुवातीला या खरेदीसाठी शासनाच्या जाचक अटीमुळे पुरता गोंधळ उडाला होता. त्यात एका शेतकर्यांची तीनच क्विंटल तूर खरेदी करण्यात येत होती.
परत त्यात शासनाने गैरसोय लक्षात घेऊन हेक्टरी 8 क्विंटल तूर खरेदीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शेतकर्याना मोठा दिलासा मिळाला होता. त्यात पुन्हा खरेदी विक्री संघाच्या खरेदीच्या काट्यात येत असलेली तफावत आणि खरेदी केलीली तूर ठेवण्यास अपुरी जागा यात खरेदी विक्री संघाकडून केवळ 7 हजार क्विंटलच तूर खरेदी करण्यात आली व महिन्याच्या आत हे खरेदी केंद्र अनागोंदी धोरणाने बंद झाले ते पुन्हा चालू झाले नाही.
अपुरे मनुष्यबळ व नियोजन शून्य कारभारामुळे खरेदी विक्री संघाकडे सुरू असलेले केंद्र बंद करून नाफेडने गत वर्षी जिल्ह्यात विक्रमी 98 हजार क्विंटल तूर खरेदी करणार्या व विक्री करण्यास येणार्या शेतकर्यांना नाममात्र 1 रुपयात जेवण देऊन आलेल्या शेतीमालाची सोय केली त्यात बाजार समितीकडे मागील आठवड्यात नाफेडने तूर खरेदी केंद्र बाजार समितीने सुरू करण्यासाठी आदेशित केले. यानंतर बाजार समितीने टीएमसी प्रकल्पात दि.21 मार्च पासून तूर खरेदीस सुरुवात केली असून महिनाभर बंद असलेल्या तूर खरेदी केंद्रामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. तूर खासगी व्यापर्याकडे विक्री करावी लागत होती. आता हे खरेदी केंद्र सुरू झाले असून बाजार समितीने देखील या तूर खरेदी केंद्रास वेठीस न धरता नंबर प्रमाणे मापात पाप न करता तसेच क्विंटला मागे 1 किलो कडता न काढता मापे होतील अशी अपेक्षा शेतकर्यांत होत आहे.
May 06 2018 1:09AM
May 06 2018 1:09AM
May 06 2018 1:09AM
May 06 2018 1:09AM
May 06 2018 1:09AM
May 05 2018 10:42PM