Sun, Aug 18, 2019 14:38होमपेज › Marathwada › तुरीस जागेची, हरभरा खरेदीस ग्रेडरची अडचण

तुरीस जागेची, हरभरा खरेदीस ग्रेडरची अडचण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

परभणी : प्रतिनिधी

जिल्ह्यातील सहा केंद्रांवर नाफेड अंतर्गत तुरीची खरेदी सध्या सुरू आहे. पण तूर साठवण करण्याकरिता या केंद्रांना जागेची मोठी अडचण निर्माण झाल्याने खरेदी प्रक्रिया मंदावली आहे. या खरेदीसाठी शासनाची 18 एप्रिल ही अंतिम मुदत दिली असून आजही हजारो शेतकरी प्रतिक्षेत आहेत.

 सध्या ज्या प्रमाणे शेतकर्‍यांनी अर्ज दाखल केलेले आहेत तशी खरेदी सुरू नसल्याचे वास्तव पाहवयास मिळत आहे. असाच प्रकार हरभरा पिकाचा झाला असून या खरेदीचे आदेश असताना केवळ ग्रेडर मिळाला नाही म्हणून ती  सध्या बंद पडली आहे. या सर्व बाबींचा मात्र शेतकर्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

जिल्ह्यात सहा केंद्रावरील खरेदीसाठी तब्बल 8 हजार 45 शेतकर्‍यांनी नोंदणी केली होती. सदरील खरेदीसाठी मानवत येथे विदर्भ फेडरेशनच्या वतीने हमीभाव पध्दतीने खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. या केंद्रावर तूर साठवणीकरिता जागा अपुरी पडत असल्याचे बोलल्या जात आहे. यामुळे खरेदी प्रक्रिया संथगतीने होत आहे. तसेच शासनाचे अनेक निकष किचकट असल्याच्या बाबी शेतकरी बोलत आहेत. ज्या पध्दतीने शेतकर्‍यांनी हमीभाव खरेदीसाठी नोंदणी केली तशी खरेदी मात्र झाली नाही. 28 मार्चपयंर्ंत केवळ 1 हजार 718 शेतकर्‍यांच्याच तुरीची खरेदी करण्यात आली आहे. खरेदीसाठी शासनाने दिलेल्या 18 एप्रिलच्या अंतिम मुदतीला केवळ 19 दिवसाचा कालावधी शिल्लक राहिला असून आजही 6 हजार 327 शेतकरी हे वेटिंगवर असल्याचे दिसते. शेतकरी शिल्लक राहत असल्याने शासनाकडून अंतिम मुदतीत वाढही केली जाऊ शकते असे बोलल्या जात आहे. पण सध्या तूर खरेदीसाठी केंद्रांवर काट्यांची संख्या वाढविली तर डेडलाईनपर्यंतही तुरीची खरेदी पूर्ण होऊ शकते हेही तेवढेच निश्‍चित  मानले जाते. 


  •