Sat, Sep 22, 2018 16:32होमपेज › Marathwada › उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्‍न

उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्‍न

Published On: Feb 10 2018 10:33PM | Last Updated: Feb 10 2018 10:33PMलोहारा : वार्ताहर

लोहारा तालुक्यातील जेवळी (उ) येथे एका माहिलेच्या आंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना दि. ८ रोजी सकाळी ११ वाजता घडली. या प्रकरणी पिडीत महिलेच्या जबाबावरून एका विरूद्ध लोहारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तर जेवळी येथील शिवबाई राजू बंडगर ही महिला गुरूवारी अकरा वाजता घरी असताना तेथे आलेल्या वैजीनाथ लिंबाजी ओवांडे याने शिवबाईच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. सदर महिला ४० टक्के भाजली असून तिला सोलापूर  येथील जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. स्वतः पिडीत महिला शिवबाई बंडगर यांच्या जबाबावरून लोहारा पोलिस ठाण्यात वैजिनाथ लिंबाजी ओवांडे याचे विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. संशयितास पोलिसांनी अटक करून लोहारा न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.  पुढील तपास सहाय्यक पो. नि. होगले हे करत आहेत .