Sat, Jun 06, 2020 07:35होमपेज › Marathwada › त्या अजस्त्र अजगरावर सर्पराज्ञीत उपचार सुरू

त्या अजस्त्र अजगरावर सर्पराज्ञीत उपचार सुरू

Published On: Dec 10 2017 6:03PM | Last Updated: Dec 10 2017 6:03PM

बुकमार्क करा

शिरूर कासार : प्रतिनिधी

बीड -अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या बेलपारा प्रकल्पाच्या पायथ्याशी शुक्रवार (दि.०८) दहा फूट लांबीचा अजगर जखमी अवस्थेत आढळला होता.  त्याला वाईड लाइफ प्रोटेक्शन अँड सॅक्टयुअरी असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी पकडण्यात आले होते. वनविभागाच्या मदतीने तागडगाव जिल्हा बीड येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात दाखल केले.

‘अजगराची हालचाल मंद झालेली आहे, त्याच्या मलमूत्राचाही उग्र वास येत आहे, अन्नही खात नाही. त्याच्या या बाह्यलक्षणावरून त्याला अमेबिअसिस (Amebiasis)ची लागण झाल्याचे जाणून येत असले तरी त्याचे अचूक निदान करण्यासाठी त्याच्या मलमूत्राची तपासणी करावी लागणार असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी विजय चौरे यांनी सांगितले.

वडगाव येथील विकास शेळके यांना त्यांच्या ऊसाच्या शेतात अजस्र अजगर आढळून आला होता. त्यांनी या घटनेची माहिती वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड सॅक्टयुअरी असोसिएशनचे अध्यक्ष सिद्धार्थ सोनवणे यांना भ्रमणध्वनी वरून दिली. त्यानंतर तात्काळ सिद्धार्थ सोनवणे व अमोल ढाकणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या अजगरास पकडले. त्याच्यावर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ विजय चौरे ,डॉ. निलेश सानप उपचार करत आहेत. या अजगराची शुश्रूषा सर्पराज्ञीच्या संचालिका सृष्टी सोनवणे ह्या करत आहेत.

अजगराच्या प्रकृतीत सुधारणा होत असून लवकरच हे अजगर बरे होईल. पूर्ण बरे झाल्यानंतर या अजगरास त्याच्या मूळ अधिवासात वन अधिकाऱ्याच्या उपस्थित सोडून देण्यात येईल.’असे  सृष्टी सोनवणे यांनी सांगितले.