Wed, Jun 26, 2019 23:43होमपेज › Marathwada › घाणीच्या विळख्यात ट्रॉमाकेअर सेंटर

घाणीच्या विळख्यात ट्रॉमाकेअर सेंटर

Published On: Feb 16 2018 2:30AM | Last Updated: Feb 16 2018 2:09AMपरभणी : प्रतिनिधी 

जिल्हा सामान्य रुग्णालयातील ट्रॉमाकेअर सेंटरमधील अपुर्‍या रुग्णसेवेमुळे बाहेरून येणार्‍या रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. रुग्णांची वाढती संख्येच्या तुलनेत विभागात सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. यासाठी प्रशासकीय स्तरावर विचार करून सुविधा उपलब्ध करून देणार्‍या घटकांची पूर्तता करणे अपेक्षित आहे,अशी माहिती विभागातील कर्मचार्‍यांनी दिली. 

जिल्हा सामान्य रुग्णालयात 23 खाटा असलेल्या या कक्षात दररोज 40 ते 50 रुग्ण उपचारासाठी येतात. यामुळे उर्वरित रुग्णांना जमिनीवरच उपचार घेण्याची वेळ येते. 8 स्टाफ नर्स कर्मचारी कार्यरत आहेत, मात्र अजून एका कर्मचार्‍याची आवश्यक्ता भासत आहे.  पिण्याच्या पाण्याची सुविधा नसलेल्या या विभागात रुग्णांना बाहेरून पिण्याचे पाणी घेऊन यावे लागतेे. स्वच्छता कर्मचारी नसल्याने वार्डात अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. वार्डाच्या प्रवेशद्वाराजवळच सांडपाणी टाकण्यात आल्याने निर्माण झालेली दुर्गंधी परिसरात पसरली आहे. याचा त्रास रुग्ण व कर्मचार्‍यांना सहन करावा लागत आहे.