Wed, Apr 24, 2019 07:52होमपेज › Marathwada › मुलींना सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण : क्षीरसागर

मुलींना सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण : क्षीरसागर

Published On: Jul 20 2018 1:12AM | Last Updated: Jul 19 2018 11:07PMबीड : प्रतिनिधी

शालेय, महाविद्यालयीन युवती तसेच महिलांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी मार्शल आर्ट प्रशिक्षण गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्राचार्या डॉ. दीपा क्षीरसागर यांनी केले. 

गुरुवार (दि.19) रोजी शिवाजीनगर भागातील संभाजी प्राथमिक विद्यालयात माता - पालक संघ बैठक व सेल्फ  डिफेन्स मार्शल आर्ट असोशिएशनच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्या डॉ. दीपा क्षीरसागर बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापिका भोज, प्रा. योगेश पवार, प्रशिक्षक डोंगरे, प्रा. ए. एस. शिंदे, प्रा. जे. व्ही. कोळेकर, प्रा. बी. एम. सानप, प्रा. डी. ए. नेटके यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना प्राचार्या डॉ. दीपा क्षीरसागर म्हणाल्या, की समाजात वावरत असताना स्त्रीयांना छेडछाड, विनयभंग, लैगिंक छळ, कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार यासारख्या संकटांना सामारे जावे लागत आहे. अशा प्रवृत्तींचा खंबीर प्रतिकार करण्यासाठी शारिरीकदृष्ट्या सक्षम आणि मजबूत करण्याबरोबर येणार्‍या आव्हानांचा सामना करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे डॉ. दीपा क्षीरसागर म्हणाल्या. यासाठी मार्शल आर्टचे प्रशिक्षण गरजेचे असल्याच्याही त्या म्हणाल्या. जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थीनींना प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्या म्हणाल्या. 

बीड येथील संभाजी प्राथमिक विद्यालयात विद्यार्थीनींसाठी गुरुवारपासून मार्शल आर्टच्या प्रशिक्षणास सुरुवात झाली. यावेळी काही विद्यार्थिनींना मार्शल आर्टचे प्रात्यक्षीकही करून दाखविले. या विद्यालयात पुढील काही दिवस हे प्रशिक्षण चालणार आहे. याचा विद्यार्थिनीना उपयोग होणार आहे.