Mon, Nov 19, 2018 06:17होमपेज › Marathwada › लातूर जिल्ह्यातील जानवळ मध्ये ट्रॅक्टर पोळा

लातूर जिल्ह्यातील जानवळ मध्ये ट्रॅक्टर पोळा

Published On: Sep 09 2018 7:59PM | Last Updated: Sep 09 2018 7:59PMलातूर : प्रतिनिधी

चाकूर तालुक्यातील जानवळ या गावी ट्रॅक्टर पोळा साजरा करण्यात आला. ट्रॅक्टर मालकांनी सकाळी ट्रॅक्टर धुतले. माळा फुलांनी उसाच्या भाल्यांनी व आंब्याच्या डहाळ्याने ट्रॅक्टरचे हेड सजवण्यात आले . त्यानंतर ट्रॅक्टरचे पूजन करण्यात आले. श्रीफळ वाढवल्यानंतर ग्रामदेवतेच्या प्रदक्षिणेसाठी सर्व ट्रॅक्टर्स रांगेत लावण्यात आले व त्यानंतर मंदिरास प्रदक्षिणा घालण्यात आली.

‘‘बैलाप्रमाणेच आता शेतीची कामे ट्रॅक्टरद्वारे होत आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर पोळा साजरा करण्याचा आम्ही निर्णय  घेतला होता. त्यासाठी ट्रॅक्टर मालकांची बैठक घेऊन हा विचार मांडण्यात आला होता. ही कल्पना सर्वांना आवडली होती. विशेष म्हणजे सोशल मीडियातून याची माहिती आम्ही सर्वांना दिली होती. अनेकांनी त्याचे स्वागत केले होते’’, असे ट्रॅक्टर मालकांनी सांगितले. बैल प्रदक्षिणेला अडचण येऊ नये म्हणून ट्रॅक्टर पोळा सकाळी साजरा करण्यात आला.