Fri, Nov 16, 2018 04:57होमपेज › Marathwada › राजीनाम्यासाठी महिला उपसरपंचाची छेड

राजीनाम्यासाठी महिला उपसरपंचाची छेड

Published On: May 21 2018 1:18AM | Last Updated: May 21 2018 1:18AMबीड : प्रतिनिधी 

 राजीनामा देण्यासाठी दबाव टाकत महिला उपसरपंचाची छेड काढल्याप्रकरणी धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव बबन बडे यांच्यासह चौघांविरुद्ध दिंद्रूड पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दिंद्रूड पोलिस ठाणेतंर्गत एका गावातील महिला उपसरपंचावर राजीनामा द्यावा म्हणून मागील दीड वर्षापासून दबाव आणला जात आहे. राजीनामा देण्यासंदर्भात वारंवार सांगूनही कसलाच प्रतिसाद मिळत नसल्याने चौघांनी मोबाइल व्हॉट्सअ‍ॅपद्वारे अश्लील शब्दात बदनामी केली व पाठलाग करुन अश्लील भाषा वापरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

या प्रकरणी महिला उपसरपंचाने दिलेल्या फिर्यादीवरून धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव बबन बडे, विष्णू भगवान बडे, भगवान वैजिनाथ बडे, बालासाहेब बळीराम बडे यांच्याविरुद्ध दिंद्रूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि. टाकसाळ हे करत आहेत.