Thu, Jul 18, 2019 00:17होमपेज › Marathwada › ‘वाचन’ संस्कृती रुजविणारा अवलिया

‘वाचन’ संस्कृती रुजविणारा अवलिया

Published On: Apr 06 2018 2:21AM | Last Updated: Apr 05 2018 11:55PMपाटोदा : महेश बेदरे 

पाटोदा तालुक्यात विविध क्षेत्रात प्रतिभावंतांची कमी नाही, या मातीतीत अनेक दिग्गजांनी क्रिडा, कला सह विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करून, पाटोदा तालुक्याचे नाव जागतिक पातळीपर्यंत ऊज्वल केले आहे. याच सर्व क्षेत्रांप्रमाणे साहित्य विश्वातही पाटोद्याच्या प्रा. डॉ. मधुकर क्षीरसागर या लेखकाने मोठी गगनभरारी घेऊन आपल्या विपुल लेखन संपदेने ’ महाराष्ट्र रत्न पुरस्कार ’ ( व्यसनमुक्ती वरील लेखन) सह मागील काही वर्षात अनेक पुरस्कारांवर नाव कोरून या क्षेत्रातही पाटोद्याचे नाव उंचावले आहे  त्याच प्रमाणे त्यांनी तरुणांमध्ये वाचनाची  आवड निर्माण व्हावी या साठी आपल्या स्वतःच्या घरातच एक छोटेखानी वाचनालय तयार केले आहे. 

त्या ठिकाणी त्यांनी स्वखर्चतुन अनेक दर्जदार पुस्तकांचा संग्रह केला आहे. ते वाचनप्रेमींना विनामुल्य पुस्तके वाचन्यासाठी देतात. पाटोदा येथील पीव्हीपी महाविद्यालय या ठिकाणी मराठी विभाग प्रमुख म्हणुन गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. डॉ. क्षीरसागर यांचे आतापर्यंत विविध लेखन प्रकारातील अनेक पुस्तक प्रकाशित झाली आहेत. यामध्ये प्रामुख्याने ‘आपटीचे पंडित’ या कादंबरीसह स्वांग हा व्यसनमुक्ती विषयावरील कथासंग्रह श्रीराघवेंद्र लीलामृत, संत महात्माजी चरित्रामृत हे संतसाहीत्य, भारा व फकडी हे ग्रामीण कथासंग्रह तसेच व्यसनमुक्तिची गाणी’ यासह अनेक पुस्तक प्रकाशित झाली. त्यांच्या फकडी या कथासंग्रहास सलग दोन वर्ष राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे.

व्यसनमुक्तिसाठी कार्य व लेखन 

प्रा. डॉ. क्षीरसागर यांनी व्यसनमुक्ति विषयासाठी मोठ्या प्रमाणात  लेखन केले आहे. यामध्ये  गीत, लेख, तसेच ओवीबद्ध गीतातून नाट्यमय सादरीकरण करण्यात येते. त्यांना ‘महाराष्ट्र रत्न ’ पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.  

कांदबरी, कविता, कथा, गीत , एकांकीका, ओवी, आरती अशा विविध लेखन प्रकारात आपल्या प्रतिभेने त्यांनी लेखन केलेले असुन ‘दिंडी’ या विषयावरही त्यांनी पी. एचडी केली आहे . पाटोद्यासारख्या ग्रामीण भागातुनही डॉ. क्षीरसागर यांनी एवढया मोठया साहित्याची निर्मिती करुन पाटोद्याचे नाव तर ऊज्वल केलेच आहे परंतु, त्याचबरोबर त्यांचे हे कार्य या भागातीत नवलेखकांसाठीही प्रेरणादायी आहे .

मिळालेले पुरस्कार

स्व.नानासाहेब वरणगांवकर स्मृति राज्यस्तरीय पुरस्कार(2012 )
ऱाज्यस्तरीय काब्यलेखन ( 2013)
राज्यस्तरीय साहीत्य पुरस्कार (2013) 
महाराष्ट्र रत्न पुरस्कार  (2016 ) 
आर्दर्श प्राध्यापक (2017) 
रोटरी भूषण ( 2017 )
सन्मनपत्र ( एमकेसिएल ) 
प्रशस्तिपत्र - कुसुमताई अविळे सेवा संस्था ( 2017) 
मराठी साहित्य प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरस्कार (2018) जामखेड

 

Tags : Patoda, Patoda news, Madhukar Kshirsagar, reading, home reading room