Mon, Mar 18, 2019 19:33होमपेज › Marathwada › विमा न भरलेल्या शेतकर्‍यांनाही भरपाई देणार

विमा न भरलेल्या शेतकर्‍यांनाही भरपाई देणार

Published On: Feb 13 2018 2:41AM | Last Updated: Feb 13 2018 2:28AMगेवराई : प्रतिनिधी

निसर्गाच्या कोपाने पुन्हा एकदा शेतकरी बांधवाना अडचणीत आणले आहे. तरी आलेल्या सकंटाला तोड देणार्‍या शेतकर्‍यांच्या पाठिशी सरकार खंबीर पणे उभे असून ज्या शेतकर्‍यांनी पीक विमा भरणा केला नसेल त्यांनी घाबरू नये कारण पीक विमा भरला नसलेल्या शेतकर्‍यांना सुद्धा नुकसान भरपाई देण्यात येईल असे खा.प्रीतम मुंडे यांनी सोमवारी नुकसान झालेल्या पिकाची पहाणी करताना सांगितले. 

रविवारी सकाळी अचानक झालेल्या गारपिठीने गेवराई तालुक्यातील उमापूर, चकलांबा या मंडळातील अनेक गावांत वादळी वार्‍यासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली.
 दरम्यान यामध्ये पडझडीच्या घराची व पिकांची नासाडी झालेली असून शेतकर्‍यांवर संकट आले आहे. त्यामुळे गारपीट झालेल्या शेताची पहाणी करण्यासाठी बीडच्या खा.प्रीतम मुंडे यांनी सोमवार दि.12 फेब्रुवारी रोजी सकाळी तालुक्यातील खळेगाव येथील शेतात जाऊन पहाणी केली.

यावेळी आ. लक्ष्मण पवार, विजय गोल्हार, संतोष हंगे , नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, दादासाहेब गिरी, नगरसेवक याहिया पठान, प्रल्हाद येळापुरे, संजय आंधळे, ना.तहसीलदार, कृषी सहायक,  तलाठी आदी उपस्थिती होते. यावेळी बोलताना आ. लक्ष्मण पवार म्हणाले की, गेवराई तालुक्यातील उमापूर, पौळाचीवाडी, खळेगाव, माटेगाव, आदी गावांतील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले तरी दोन दिवसांत पंचनामे करून शासन दरबारी प्रस्ताव दाखल करतील त्यानंतर पालकमंत्री पंकजा मुंडे, खा.प्रीतम मुंडे व मी प्रयत्न करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना अनुदान मिळवून देऊ असे आ. लक्ष्मण पवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रसाद आहेर, सरपंच दादासाहेब साळवे, उपसरपंच अशोक काळे, अशोक आहेर, बंडू बहिरे, विनोद आहेर, भाऊसाहेब आहेर, जनार्दन आहेर, दशरथ आहेर,  बाळासाहेब आहेर, गोपाळ आहेर, प्रशांत छडेदार आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या दौर्‍यानंतर खा.प्रीतम मुंडे यांनी बीडमध्ये आढावा बैठक घेतली.