Wed, Jul 17, 2019 10:37होमपेज › Marathwada › शहीद जवानाच्या कुटुंबास पक्के घर बांधून देणार

शहीद जवानाच्या कुटुंबास पक्के घर बांधून देणार

Published On: Apr 08 2018 2:02AM | Last Updated: Apr 08 2018 2:02AMगंगाखेड : प्रतिनिधी

पालम तालुक्यातील कोनेरवाडी येथील भूमिपुत्र शुभम मुस्तापुरे हे देशासाठी शहीद झाले. त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीत सरपंच व ग्रामस्थांच्या मागणीवरून शहीद जवानाच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने पक्के घर बांधून देण्याचे आश्वासन गंगाखेड शुगरचे चेअरमन डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी सांत्वन भेटी दरम्यान दिले.

देशासाठी शहीद झालेल्या मुस्तापुरे यांना आदराजंली वाहत डॉ.गुट्टे यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून आई, वडील व लहान भाऊ यांना धीर दिला. यावेळी गावातील सरपंच आणि प्रतिष्ठित नागरिकांनी मुस्तापुरे यांच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याचे सांगितले. याप्रसंगी कायमस्वरूपी पक्के बांधून देण्यासाठी डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्याकडे मागणी केली.त्यावर डॉ.गुट्टे यांनी कायमस्वरूपी पक्के घर तातडीने बांधून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी जि.प.सदस्य किसनराव भोसले, राजेश फड,  सीताराम राठोड़, साहेबराव सूरनर, बालाजी वाघमारे, राजेभाऊ कदम, राजेभाऊ सातपुते, नंदकुमार पटेल, सुरेश बंडगर, संदीप पाटील, राम लटके उपस्थित होते.

Tags : Marathwada, build, permanent, house, martyrs soldier, family