होमपेज › Marathwada › नांदेडमध्ये तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू

नांदेडमध्ये तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू

Published On: Aug 04 2018 5:58PM | Last Updated: Aug 04 2018 5:57PMनांदेड : प्रतिनिधी

घरी न सांगता शाळेला दांडी मारून गोदावरी नदीत  पोहण्यासाठी उतरलेल्या तीन शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी  मृत्यू झाला. ही घटना शहराच्या नवीन नांदेड परिसरातील साईबाबा मंदिराजवळ दि. ४ रोजी शनिवारी दुपारी घडली.

शहरातील नमस्कार चौक परिसरात असलेल्या शिवनगर येथील एकाच गल्लीतील तीन शाळकरी विद्यार्थी मित्र शिवम गणेश जाधव (वय १६), आनंद मारोती केंद्रे (१५), शुभम संजय जगताप (१६) हे तिघेजण वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकायला होते. यातील शुभम व आनंद हा दहावीच्या वर्गात शिकत होते तर शिवम हा सातवीत शिकायला होता. 

साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना गोदावरी नदीत पोहण्यासाठी उतरले. नदीत असलेल्या खड्ड्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघेही पाण्यात बुडाले. ही घटना नदीपात्रात असलेल्या गोदावरी जीवरक्षक दलाच्या जवानांना समजल्यानंतर या बालकांना वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्‍न केले परंतु ते तिघेही पाण्यात बुडाले होते. त्यांना वाचविण्यासाठी करीम, इकबाल, आरेफ, भरत कुकडे, ताज यांच्यासह अनेक जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. जवानांच्या अथक प्रयत्नानंतर या तीन बालकांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. 

या घटनेची माहिती समजताच नव्यानेच रुजू झालेले अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, नांदेड ग्रामीणचे पो.नि.चिखलीकर घटनास्थळी दाखल झाले