Fri, Jul 19, 2019 13:28होमपेज › Marathwada › तीन दिवसांनंतर वीज आली, तीन निष्पाप जीव घेऊन गेली

तीन दिवसांनंतर वीज आली, तीन निष्पाप जीव घेऊन गेली

Published On: Jun 15 2018 1:05AM | Last Updated: Jun 15 2018 1:05AMअंबाजोगाई : प्रतिनिधी 

उन्हाळ्याची सुटी मामाच्या गावी घालवण्यासाठी आलेल्या भाच्यांना मामी आपल्या पोटच्या मुलीसह पाच बाय दहाच्या रूम मध्ये घेऊन गाढ झोपली होती. दोन-तीन दिवसांपूर्वी लाईट गेली . पाणी तापवण्याचे गिझरचे बटन चालू असल्याने तीन दिवसांच्या खंडानंतर वीज आली. मात्र ती निष्पाप जीव घेऊन गेली. निष्काळजीपणामुळे या तीन बालिकांचा बळी गेला ,अशी चर्चा  होत असून लेकरांना  कुशीत घेऊन झोपलेली महिला संगीता भताने यांच्यावर लातूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जून महिना उजाडला नंतर मान्सूनपूर्व पावसाने सर्वांची भंबेरी उडवली. वार्‍यामुळे ग्रामीण भागातील विद्युत मंडळाचे खांब कोसळल्याने लाईट गुल झाली. त्यामुळे रात्रीच्या वेळी लाईटचे बटणे ऑन होती. महावितरणच्या  तीन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर लाईट आली. गावकर्‍यांनी सुटकेचा श्वास सोडला. भतनवाडी गाव उजणीपासून काही अंतरावर  डोंगरात आहे. या गावची लाईट ही तीन दिवसांपासून बंद होती. या गावचे रहिवाशी संभाजी भताने यांचे कुटुंब दिवसभर शेतात काम करून आल्यानंतर चिमणीच्या उजेडात जेवणे केली .मामाच्या गावाला सुटी घालवण्यासाठी आलेली दुर्गा घुगे (परभणी)  धनश्री राजेंद केदार (रेणापूर) व संभाजी भताने ची मुलगी आदिती भताने या तीन चिमुकल्यांना घेऊन संभाजीची पत्नी संगीता भताने या घरात गाढ  झोपी गेल्या होत्या.

तीन दिवसांपूर्वी गेलेली वीज आली. संगीता भताने ज्या खोलीत तीन मुलांना घेऊन झोपल्या होत्या. त्यांच्या उशाला पाणी गरम करण्याचे फायबरचे  गिझर होते. विद्युत पुरवठाचे बटन तसेच सुरू राहिले,लाईट आल्यानंतर गिझर सुरू झाले. पाणी एवढे गरम झाली की, त्या पाण्यामुळे फायबरचा डबा वाकडा होऊन उकळते पाणी गाढ झोपेत असणार्‍या तीन निष्पाप बालकांच्या अंगावर पडले. बाजूला झोपलेल्या संगीता भतानेही गरम पाण्याने भाजल्याने एकच कल्लोळ उडाला. घराच्या समोर झोपलेले संगीता भतानेचे सासरे दत्तुराम भताने व सासूने कल्लोळ ऐकताच दार उघडले. आपले तीन नातू व सून गरम पाण्याने भाजल्याचे लक्षात येताच थंड पाण्याचा मारा केला. तरीही किंकाळ्या बंद होईनात, म्हणून जखमींना अंबाजोगाईच्या रुग्णालयात उपचारासाठी आणले असता, डॉक्टरांनी लातुरला हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार चौघांनाही लातुरला हलवण्यात आले. उपचारादरम्यान आदिती भताने शनिवारी, दुर्गा घुगे मंगळवारी तर धनश्री केदार बुधवारी मृत झाल्या. जखमी संगीता भतानेवर लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काळाने घाला घातला

सोनपेठ येथील बिभीषन घुगे यांची मुलगी दुर्गा घुगे व दुसरी घोटी तालुका चाकूर येथील धनश्री केदार व स्वतः संगीता भतानेची आदिती या तीन मुलीवर काळाने घाला घातला. आदितीचा अंत्यविधी भतनवाडी तर इतर दोघीचा अंत्यविधी आपापल्या गावी उरकण्यात आल्याचे नातेवाइकाने सांगितले.

4 पत्र्यांच्या खोल्यात दोन कुटुंबे

भतनवाडी गावात घडलेल्या घटनेने तालुका सुन्न झाला आहे. मात्र दत्तू भताने व संभाजी भताने बाप लेकाचे दोन कुटुंब पाच बाय दहाच्या दोन खोल्यात राहते. या गावच्या पंचायत समितीच्या सभापती मीना भताने आहेत . कुठे गेली शासनाची घरकूल योजना अशीही चर्चा होत आहे.