होमपेज › Marathwada › हजारावर शेतकर्‍यांची तूर खरेदीविना पडून

हजारावर शेतकर्‍यांची तूर खरेदीविना पडून

Published On: Apr 22 2018 1:12AM | Last Updated: Apr 21 2018 10:21PMमाजलगाव : प्रतिनिधी

राज्य शासनाने नाफेड मार्फत सुरू केलेल्या तूर खरेदी केंद्र दि.18 पासून बंद केल्यामुळे माजलगाव येथील बाजार समितीच्या खरेदी केंद्रावर जवळपास हजार शेतकर्‍यांची तूर खरेदी अभावी जागीच पडून आहे. आठ-पंधरा दिवसाला नियम, अटी बदलण्याच्या धोरणामुळे शेतकर्‍यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

माजलगाव तालुक्यात सुरुवातीला येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या मार्फत नवीन मोंढ्यात असलेल्या टिएमसी आवारात तूर खरेदी केंद्र होते, मात्र अपुर्‍या यंत्रणेमुळे व खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी शासकीय गोदाम शिल्लक नसल्याचा आडथळा आला होता. जिल्हा मार्केटिंग अधिकारी बीड यांनी हे तूर खरेदी केंद्र कृषी उत्पन्न बाजार समितीकडे वर्ग करण्यात आले असून बाजार समितीने दि.21 मार्चपासून हे केंद्र सुरू केले.  खरेदी विक्री संघाने 2140 शेतकर्‍यांच्या नोंदी केल्या होत्या त्यात पुन्हा बाजार समितीने 550 शेतकर्‍यांच्या नवीन नोंदी करून तूर खरेदी सुरू केली. बाजार समितीने दि.18 पर्यंत एकूण 10 हजार 36.50 क्विंटल एवढी तूर खरेदी केलेली असून सध्या बंद असलेल्या तूर खरेदीमुळे खरेदी केंद्रावर आणलेल्या जवळपास 1 हजार शेतकर्‍यांचे तुरीचे माप होणे बाकी असल्याने हे शेतकरी हवालदिल झाले आहेत. खरेदी केंद्रा मार्फत एकूण 1135 शेतकर्‍यांना एसएमएस पाठवले आसल्याने ते शेतकरी तुर खरेदी केंद्रावर तूर आणू शकतता, परंतु खरेदीच बंद असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

Tags : Marathwada, Thousands,  farmers, fall, without, buying, tur