होमपेज › Marathwada › मुख्यमंत्री येण्यापूर्वीच तीस व्होर्डिंग्ज जप्त

मुख्यमंत्री येण्यापूर्वीच तीस व्होर्डिंग्ज जप्त

Published On: Feb 16 2018 2:30AM | Last Updated: Feb 16 2018 1:50AMबीड : प्रतिनिधी

शहरातील चौका-चौकात, मोकळ्या जागेसह विद्युत पोलवर अनेकांनी पालिकेची परवानगी न घेता व्होर्डिंग लावून शहरात धुमाकूळ घातला होता. या व्होर्डिंगचा वाहतुकीस मोठा अडथळा तर निर्माण होतच होता. शिवाय त्यामुळे विद्र्रुुपीकरणही झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून अशी असलेली परिस्थिती सुधारण्यासाठी पालिकेने गुरुवारचा मुहूर्त साधत शहर अनाधिकृत व्होर्डिंग्जमुक्त केले. 

विशेष म्हणजे शहरात अनेक ठिकाणी आ. विनायकराव मेटे यांनी व्होर्डिंग लावत मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले होते. हे सर्व अनधिकृत बॅनर पालिकेने हटविले आहेत. बीड शहरातील सुभाष रोड, नगररोड, जालना रोड, बार्शी नाका, अण्णाभाऊ साठे चौक, शिवाजी पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आदी प्रमुख ठिकाणांवर सातत्याने अनधिकृत व्होर्डिंग्ज लावण्यात येतात. यामुळे शहरातील प्रमुख ठिकाणांचे विदु्रपीकरण तर होतेच याचा वाहतुकीसह अडथळा होतो. यामुळे व्होर्डिंग्ज हटवा, अशी नागरिकांमधून सातत्याने मागणी असते. 

दरम्यान, गुरुवारी मुख्यमंत्री देेवेद्र फडणवीस नारायण गड येथे विकास कामांचे भूमिपूजन करण्यासाठी येत होते. त्यांचे स्वागत करण्यासाठी आ. विनायकराव मेटे यांनी व त्यांच्या समर्थकांनी शहरात जागोजागी बॅनर लावले होते. यामुळे बीड शहर मेटेमय झाले होते. याच दरम्यान पालिकेना अनधिकृत बॅनर हटविण्याची मोहीम हाती घेण्यास वेळ मिळाला. पालिकेने सतर्क होत व नियमांवर बोट ठेवत अनधिकृत बॅनर तत्काळ हटविले.