Tue, May 21, 2019 18:28होमपेज › Marathwada › प्रवाशांच्या सुरक्षिततेवर तिसर्‍या डोळ्याची नजर

प्रवाशांच्या सुरक्षिततेवर तिसर्‍या डोळ्याची नजर

Published On: Apr 25 2018 12:57AM | Last Updated: Apr 24 2018 11:01PMपाटोदा : महेश बेदरे

पाटोदा बसस्थानकातील सुरक्षा राम भरोसे असल्याचे चित्र दै. पुढारीतून समोर आणले होते. याची गंभीर दखल पाटोदा आगार प्रमुखांनी घेतली आहे. पाटोदा बसस्थानकाचा परिसर अत्यंत मोठा व विस्तीर्ण आहे. याच आवारात डेपो तसेच आगार व्यवस्थापकांचे निवासस्थान आहे. पाटोदा आगारातून रात्री  उशीरापर्यंत गाड्यांची ये जा सुरू असते. नांदेड -पुणे, तसेच पाटोदा - मुंबई अशा अनेक लांब पल्यांच्या गाड्या येथून जात असल्याने ग्रामीण भागातून शहराकडे जाणार्‍या प्रवाशांची या ठिकाणी मोठी वर्दळ असते. रात्री - अपरात्री देखील काही प्रवाशी बसस्थानकात असतात.

गुरुवारी बाजारच्या दिवशी देखील या बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी असते. या बसस्थानक परिसरात सुरक्षेच्या दृष्टिने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची अत्यंत गरज होती. अनेक वेळा या ठिकाणी पॉकेट मारी, मोबाइल चोरी, अशा घटनाबरोबरच मुलींची छेडछाड, तळीरामांचा प्रवाशांना त्रास असे प्रकार घडतात. यामुळे या आगारातील वास्तव दै. पुढारीने मांडले होते. याची आगार प्रमुखांनी गंभीर दखल घेतली असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. 

Tags : Third eye on the safety of the passengers