Fri, Aug 23, 2019 15:18होमपेज › Marathwada › अनैतिक संबंधातून महिलेची जाळून हत्या 

अनैतिक संबंधातून महिलेची जाळून हत्या 

Published On: Mar 15 2018 1:19AM | Last Updated: Mar 14 2018 11:49PMगंगाखेड : प्रतिनिधी 

तालुक्यातील पडेगाव शिवारात 32 वर्षीय विधवा महिलेची अनैतिक संबंधातून हत्या करण्यात आली. पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत कडब्याच्या गंजीमध्ये टाकून जाळण्यात आल्याची घटना दि. 14 मार्च रोजी उघडकीस आली. पडेगाव शिवारात आश्रोबा बोबडे यांच्या शेतात अज्ञात व्यक्‍तीने महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर तिला घटनास्थळावरून बाजूच्या कापसाच्या शेतात नेऊन तिची हत्या केली.

तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी ज्वारीच्या कडब्यातील गंजीत तिचा मृतदेह टाकून पेटवून देण्यात आला होता. यानंतर शेतकरी कडबा आणण्यासाठी गेला असता त्यास महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्याने त्याने याबाबत पोलिसांना माहिती दिली. संबंधित महिला बेपत्ता असल्याची तक्रार दोन दिवस अगोदर दाखल करण्यात आली होती. रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू होते.