Sat, Sep 22, 2018 05:04होमपेज › Marathwada › भोळसर महिला ठरतेय स्वच्छतादूत

भोळसर महिला ठरतेय स्वच्छतादूत

Published On: Mar 13 2018 1:42AM | Last Updated: Mar 13 2018 1:42AMपाटोदा : प्रतिनिधी

सध्या सर्वत्र स्वच्छता अभियानावर मोठा गाजावाजा करून व जाहिरातबाजी करून केवळ फोटो पुरते स्वच्छता अभियान राबविले जात असताना मागील अनेक वर्षांपासून पाटोदा बसस्थानक परिसरात एक  भोळसर महिला विनामोबदला परिसराची स्वछता करत आहे.  केवळ भंपकबाजी करणार्‍यासाठी या महिलेचे हे कार्य डोळ्यात झणझणीत अंजन घालणारेच  असुन ही महिला पाटोद्याची अनामिक स्वछता दूत ठरली आहे.

पाटोदा बसस्थानक परिसरात मागील काही वर्षांपासून एक भोळसर महिला वास्तव्यास आहे. ही महिला कोण या बद्दल फारसे कोणाला माहिती नाही, मात्र या ठिकाणचे कर्मचारी व नागरिक या महिलेला अनेक वर्षांपासून याच परिसरात फिरत असताना पाहात असल्याचे सांगतात. ही महिला काहीशी भोळसर वाटते, संपूर्ण दिवसभर ती याच परिसरात फिरून रस्त्यावरील कचरा गोळा करून कुंडीत टाकते तसेच बसस्थानक परिसरात जाणार्‍या-येणार्‍या प्रवाशांनी टाकलेली खाद्यपदार्थांची रिकामी पिशव्या व खाऊन फळांच्या टाकलेल्या साली हे देखील गोळा करून त्याची विल्हेवाट लावते. संपूर्ण दिवसभर तिचा हाच दिनक्रम सुरू असतो, ज्या वेळी भूक लागेल त्या वेळी एखाद्या गाड़ीवर वडा पाव किंवा भजे व ते न मिळाल्यास केवळ चहा मागायचा यासाठी कधी कोणाकडेही ती केवळ 1 रुपया द्या ना एवढे एकच वाक्य कायम बोलते.