Tue, Jun 18, 2019 22:18होमपेज › Marathwada › राज्यातील वन्यजीव गणना वन विभागाने केली बंद

राज्यातील वन्यजीव गणना वन विभागाने केली बंद

Published On: Apr 24 2018 1:06AM | Last Updated: Apr 23 2018 11:10PMशिरूर : युवराज सोनवणे

दरवर्षीप्रमाणे बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने केली जाणारी वन्यजीव गणना या वार्षीपासून वनविभागाने बंद केली आहे. जंगलातील वन्यजीवांची गणना त्यामुळे दरवर्षी अपडेट होत होती. पण आता अशा प्रकारची वन्यजीवांची जनगणनाच बंद करण्याचा विचित्र निर्णय वनविभागाने घेतला आहे. राज्यात दर वर्षी बौद्ध पौर्णिमेला वन्यजीव गणना केली जात होती. ब्रिटिश काळापासून ही वन्यजीव गणना करण्याची परंपरा होती, मात्र या वर्षीपासून  ही गणना बंद करण्यात आल्याचे आदेश वन विभागाने दिले आहेत. 

वन्यप्राण्यांबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी वन क्षेत्रातील पानवठ्याजवळ मचान उभारून रात्रीच्या वेळी ही गणना केली जात असे. यामुळे कोणत्या प्राण्यांची संख्या कमी झाली, याबद्दल अपडेट माहिती मिळत होती, परंतु आता वन विभागाने गणनाच करायची नाही असा निर्णय घेतल्याने जंगलातील प्राणी मोजणार कधी? कसे? केव्हा? कोण मोजणार? असे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. जर वनविभागच वन्यजीव मोजायला तयार नसतील तर आता या प्राण्यांचा वाली कोण? असा प्रश्‍न आहे. वनविभागाने घेतलेला हा निर्णय बदलून आधीचाच निर्णय कायम ठेवण्यात यावा अशी विनंती वन्यजीव अभ्यासक आणि निसर्गप्रेमींनी केली आहे.

Tags : Marathwada, wildlife, count, state, forest department