Sat, Mar 23, 2019 16:13होमपेज › Marathwada › परभणीत तहसीलदारांच्या दालनात ग्रामस्थांचे विषप्राशन

परभणीत तहसीलदारांच्या दालनात ग्रामस्थांचे विषप्राशन

Published On: Apr 19 2018 12:53PM | Last Updated: Apr 19 2018 12:53PMमानवत (जि. परभणी) : पुढारी ऑनलाईन
तालुक्यातील मानोली येथील चार ग्रामस्थांनी आपल्या मागण्यासाठी  मानवत तहसिल कार्यालयात विष प्राशन केल्याची घटना घडली आहे.  गुरुवारी सकाळी पाऊणे अकराच्या सुमारास ही घटना घडली तहसीलदार कार्यालयात हा  प्रकार घडला. 

तालुक्यातील मानोली येथील १५ ग्रामस्थांनी १० एप्रिलला तहसीलदारांना निवेदन दिले होते. यात गावातील गैरव्यवहाराची चौकशी करावी, गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, गावातील २२ बोगस बंधाऱ्याची चौकशी व्हीवी अशा विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. या समस्या  न सोडविल्यास १९ फेब्रुवारी रोजी सामूहिक आत्महत्येचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता.  

याप्रकरणी  सकाळी ग्रामस्थ तहसील कार्यालयात दाखल झाले. पोलिस प्रशासनाने ग्रामस्थांना ताब्यात घेण्याच्या प्रयत्न केला. यावेळी  लक्ष्मण शिंदे ,चंद्रकांत तळेकर, दत्ता कदम ,शेख शगिर यांनी विष प्राशन केले. त्यांना उपचारासाठी  मानवत येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी चंद्रकांत तळेकर यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे हालवण्यात आल्याचे समजते.

 

Tags :  Villagers, Vtoxicity in the tehsildars room, Parbhani, Poison