Tue, Jan 22, 2019 09:39होमपेज › Marathwada › लातूर : पेटलेल्या कारमध्ये जळून शिक्षिकेचा मृत्यू

लातूर : पेटलेल्या कारमध्ये जळून शिक्षिकेचा मृत्यू

Published On: May 23 2018 8:48PM | Last Updated: May 23 2018 8:48PMप्रतिनिधी। लातूर

लातूर येथून औरंगाबादकडे कारने  जात असलेल्या  शिक्षिकेचा कार पेटल्याने जळून मृत्यू झाला. बुधवारी पहाटे लातूर-मुरुड रस्‍त्यावर ही घटना घडली. मीनाकुमारी शिवशंकर बनसोडे (३०) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. दरम्यान  हा अपघात नसून खून असल्याचा आरोप करीत पतीवर खुनाचा गुन्हा नोंद केल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नसल्याची भूमिका मिनाकुमारी यांच्या नातेवाईकांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला आहे. 

मीनाकुमारी या शिरुर अनंतपाळ तालुक्यातील एका शाळेवर शिक्षिका होत्या. त्यांचे पती शिवशंकर बनसोडे हेही शिक्षक आहेत.  बुधवारी ते दोघे औरंगाबादला कारने निघाले होते. कार मुरुड नजिक आली असता तीने अचानक पेट घेतला. कार कशामुळे पेटली हे पहाण्यासाठी शिवशंकर खाली उतरले तेवढ्यात कारला ज्वालांनी वेढले व त्यात मिनाकुमारी जळून मरण पावल्याचे शिवशंकर याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी  प्रेत लातुरच्या सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे मिनाकुमारी यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती व ते संतप्त झाले होते. शिवशंकरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.