Tue, Apr 23, 2019 19:31होमपेज › Marathwada › ‘ते’ मूर्तीस्थळ एका दिवसात बनले श्रद्धास्थान

‘ते’ मूर्तीस्थळ एका दिवसात बनले श्रद्धास्थान

Published On: Apr 18 2018 12:50AM | Last Updated: Apr 17 2018 10:26PMपरळी : प्रतिनिधी

परळी शहरापासून अगदी जवळच कन्हेरवाडी गावाच्या अलीकडे असलेल्या एका डोंगराचे खोदकाम चालू असताना पुरातन मूर्ती सापडली. त्या मूर्तीभोवती एक भला मोठा नाग वेटाळे घालून असलेला दिसून आला. ही वार्ता सगळीकडे पसरताच लोकांनी मोठी गर्दी केली. या नंतर या स्थळाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘ते’ मूर्तीस्थळ एका दिवसात श्रद्धाकेंद्र बनले आहे. या ठिकाणी मूर्तीच्या दर्शनासाठी दिवसभर गर्दी दिसून येत होती. भजन, कीर्तन, झेंडे अन् परिसरात प्रसादाची दुकाने सुरू झाली आहेत. दरम्यान या ठिकाणी मंदिर उभारावे अशी मागणी भाविक करीत आहेत. 

या घटनेनंतर हे मूर्तीस्थळ नागरिकांसाठी कुतुहलाचा विषय ठरले आहे तर धार्मिक श्रद्धाळूंसाठी हे श्रद्धाकेंद्र ठरले आहे. उत्साही भाविकांनी तर सोमवारी मूर्ती आढळून आल्यापासूनच पुष्पहार, गुलाल वाहत त्या ठिकाणी मूर्तीची पूजा, दर्शन करण्याची लगबग सुरू केली. या ठिकाणी धार्मिक भजन, कीर्तन कार्यक्रम ही सुरू झाले आहेत. या ठिकाणी मूर्तीच्या दर्शनासाठी दिवसभर गर्दी दिसून येत होती. भजन, कीर्तन, झेंडे अन् परिसरात प्रसादाची दुकाने सुरू झाली आहेत. सेवेकरी निर्माण झाले असून या ठिकाणी येणार्‍या भाविकांना गंध लावून प्रसाद वाटप सुरू झाले. परळी -अंबाजोगाई मुख्य रस्त्यालगतच हे ठिकाण असल्याने कुतुहलापोटी नागरिकांची रीघ या ठिकाणी सुरूच आहे. 

पुरातत्त्वविभागाच्या तत्परतेची गरज 

पुरातत्त्व विभागाच्या वतीने या ठिकाणी काहीही लक्ष केंद्रीत केले गेले नाही तसेच जनतेसमोर तथ्य आणण्यासाठी अद्याप काही विशेष प्रयत्न ही करण्यात आलेले नाहीत. पुरातत्व विभागाच्या वतीने प्रयत्न केल्यास परळी व परिसरात अनेक दुर्मिळ अवशेष हाती लागू शकतात, तसेच नागरिकातील संभ्रम दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते, तसेच स्पष्टीकरण करणे आवश्यक बनले आहे.

नागराज मात्र झाले गुप्त
 

दरम्यान या संपूर्ण घटनेची चमत्कारिकता ज्या गोष्टीमुळे वाढली आहे ती म्हणजे या मूर्ती भोवती बराच वेळ संरक्षक म्हणून परिचित झालेला तो नागराज मात्र सोमवारच्या घटनेनंतर कोणालाही आढळून आलेला नाही. या डोंगरपट्ट्याच्या परिसरात अद्याप कोणालाही नाग पुन्हा आढळून आला नाही. काही सर्पमित्रांनी शोध घेण्यासाठी प्रयत्न केले पण नाग  दिसून आलेला नाही.

Tags : Marathwada, shrine, became,  place, idol