Thu, Jul 16, 2020 09:59होमपेज › Marathwada › बौद्ध धम्मासाठी त्याग करावा लागतो : महाथेरो-पूर्णा

बौद्ध धम्मासाठी त्याग करावा लागतो : महाथेरो-पूर्णा

Published On: Aug 29 2018 1:42AM | Last Updated: Aug 28 2018 10:45PMबीड ः प्रतिनिधी 

त्याग म्हणजे बलीदान आहे. भोग आणि त्याग एका ठिकाणी कधीच राहू शकत नाहीत अन् त्यागाशिवाय शील पालन होऊ शकत नाही. बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी त्याग करावा लागतो असे प्रतिपादन भदन्त उपगुप्त महाथेरो-पूर्णा यांनी  केले.

शहरातील पंचशील नगर भागातील त्रिरत्न बुद्ध विहार येथे  सोमवारी श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने धम्मदेसना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित बौद्ध उपासक, उपासिका यांच्यासह समाज बांधवांना संबोधित करताना ते बोलत होते. हा धम्मदेशनेचा कार्यक्रम भिक्खू धम्मशील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. पुढे बोलताना भदन्त डॉ.उपगुप्त महाथेरो म्हणाले की, आपल्या मुला-मुलींचे भवितव्य उज्वल करायचे असेल तर अत्तापासूनच त्यांच्यावर बुद्ध धम्माचे बीजारोपण करावे लागेल. कारण बुद्ध धम्म एकांगी नसून सर्वांगाने युक्त असल्यामुळे त्याचे आचरण  महत्त्वाचे आहे असे भन्ते म्हणाले.

भिक्खू धम्मशील यांचा 6 वा वर्षावास बीड शहरात चालू आहे. या निमित्ताने शहराच्या विविध भागात दररोज कार्यक्रम घेण्यात येत आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  प्रा. साळवे, भास्कर सरपते, सुमित डोंगरे, सदाशिव कांबळे, एम. जी. वाघमारे, शिवाजी सरवदे, विकास डोंगरे, प्रो. साळवे, जावळे यांच्यासह वर्षावास व बुद्ध विहार समिती बीडच्या वतीने परीश्रम घेतले जात आहेत. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.