Wed, Nov 14, 2018 13:08होमपेज › Marathwada › भाजप सरकारची भूमिका शेतकरी विरोधी : आ.डॉ. केंद्रे

भाजप सरकारची भूमिका शेतकरी विरोधी : आ.डॉ. केंद्रे

Published On: Jul 23 2018 1:09AM | Last Updated: Jul 22 2018 11:20PMगंगाखेड : प्रतिनिधी

राज्यातील भाजप  सरकार हे शेतकर्‍यांना संपविणारे असून शेतकर्‍यांचा पैसा अंबानींच्या तिजोरीत भरण्यासाठी पीकविम्याचे काम रिलायन्सला देऊन  जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पीकविम्यापासून वंचित ठेवण्याचे षड्यंत्र अखेर हाणून पाडले आहे.राष्ट्रवादी नेहमीच शेतकर्‍यांच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा पक्ष आहे, असे प्रतिपादन आ.डॉ.मधुसूदन केंद्रे यांनी केले.

नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात सतत पाठपुरावा करत गंगाखेड मतदारसंघातील पीकविम्याचा प्रश्‍न मांडून वंचित शेतकर्‍यांना विमा मिळवून दिल्याबद्दल पूर्णा, पालम, गंगाखेड येथील शेतकरी व राष्ट्रवादीचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या वतीने दि.22 जुलै रोजी आ.डॉ.केंद्रे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीकांत भोसले, लिंबाजी देककते, माधवराव भोसले, अ‍ॅड.स.अकबर, कैलास दीडशेरे, सदाशिव भोसले, रत्नाकर शिंदे,बंटी कचरे, सुनील चौधरी, बालाजी शेटे, राजू सानप, डॉ.देविदास चव्हाण, शंकराव मोरे, शिवम निरस, प्रल्हाद शिंदे यांच्यासह  शेतकर्‍यांच्या हस्ते आ.डॉ.केंद्रे यांचा सत्कार करण्यात आला.

आ.डॉ.केंद्रे म्हणाले की, राज्यातील बहुतांश शेतकर्‍यांना कर्जमाफी आजपर्यंत मिळाली नसून मुख्यमंत्री केवळ घोषणा करीत आहेत, पण प्रत्यक्षात कृती होतच नाही. भाजप सरकार संघाच्या इशार्‍यावर चालत असल्याने याचा लाभ फक्त एकाच समाजाला होत आहे. मराठा, धनगर, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी भूमिका राष्ट्रवादीची आहे, पण भाजप सरकार असेपर्यंत आरक्षण मिळेल असे वाटत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.