Thu, Apr 25, 2019 13:28होमपेज › Marathwada › दिव्यांगांना मदत करण्याची भूमिका गौरवास्पद : रामदास आठवले 

दिव्यांगांना मदत करण्याची भूमिका गौरवास्पद : रामदास आठवले 

Published On: Jun 08 2018 1:23AM | Last Updated: Jun 08 2018 12:14AMकळमनुरी ः प्रतिनिधी

खा राजीव सातव यांनी दिव्यांगासाठी शिबिरे घेऊन त्यांना मोफत साहित्याचे वाटप केले हा त्यांचा स्तुत्यपूर्ण उपक्रम आहे. दिव्यांगांना मदत करण्यासाठी भूमिका गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी केले.

मागील वर्षी औंढा नागनाथ येथे दिव्यांग तपासणी शिबिरातील पात्र लाभाथ्यार्र्ंना 6 जून रोजी कै. डॉ. शंकरराव सातव महाविद्यालयाच्या प्रांगणात मोफत साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी आठवले बोलत होते. यावेळी खा राजीव सातव, माजीमंत्री श्रीमती रजनीताई सातव, आ. डॉ. संतोष टारफे, जि. प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, संजय बोंढारे, धनंजय पाटील,  गयबाराव नाईक, डॉ. सतीश पाचपुते, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडकर, तहसीलदार डॉ. प्रतीभा गोरे आदी उपस्थित होते. 

पुढे बोलताना  आठवले म्हणाले की, राज्याच्या विकासासाठी खा. राजीव सातव व मी  आम्ही दोघे झटत आहोत. 2014 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची लाट होती. त्या लाटेतही खा. सातव निवडून आले. दिव्यांगांना नवी उमेद देण्यासाठी देशभरात 7 हजार अपंगांची शिबिरे घेण्यात येऊन त्यांना मोफत साहित्याचे वाटप केले. यावेळी 629 दिव्यांग लाभार्थ्यांना 1010 साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.

यामध्ये तीन चाकी सायकल, एक हाती, तीन हाती सायकल, कमोडयुक्त  खुर्ची, तीन चाकी सायकल, कुबड्या, डिजिटल अंधाच्या काठ्या, ब्रेलकिट, श्रवणयंत्र एमआयरआयम कीट आदी 54 प्रकारचे 50 लाखांचे साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. आनंद पारडकर यांनी केले. मागील तीन वर्षांपासून  खा.राजीव सातव यांच्या संस्थेमार्फत दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. जिल्ह्यातील शेकडो दिव्यांगांना शिबिराच्या माध्यमातून साहित्य मिळाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.