Thu, Mar 21, 2019 15:30होमपेज › Marathwada › कुंभार पिंपळगावात आढळला शॅमेलिऑन

कुंभार पिंपळगावात आढळला शॅमेलिऑन

Published On: Mar 05 2018 1:35AM | Last Updated: Mar 04 2018 1:48AMकुंभार पिंपळगाव : प्रतिनिधी 

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे शॅमेलिओन जातीचा दुर्मीळ सरडा एका कचर्‍याच्या डब्यात आढळला. यावेळी ग्रामस्थांनी त्याला पाहण्यास मोठी गर्दी केली होती. 

ग्रामीण भागात सरड्याला  फारसे महत्त्व नाही, परंतु नेहमी नेहमीच्या दिसणार्‍या सरड्यासारखा तो नाही. शॅमेलिऑन स्वतःचा  रंग बदलतो. रंग बदलणारा हा सरडा  अतिशय दुर्मीळ असून तो या भागात  आढळत नाही. हा सरडा झाडाच्या पानासारखा तर कधी गवतासारखा तर कधी काळ्या मातीसारखा, कागदासारखा, भगवा व  हिरवा रंगात तो आपले रंग मिसळतो.

निसर्गाची त्याला तशी देण आहे. तो शांत असून त्याचे डोके एकावर एक तीन शिरस्त्राणे घातल्यासारखे दिसते. वाकडे गोल आकार उंच शेपूट, बारीक व लांब पाय, गोल डोळे आकारात फिरतात. या सरड्यातील विविध वैशिष्ट्यांमुळे अनेकांनी त्याला मोबाइलमध्ये कैद केले.