Tue, Jul 23, 2019 02:26होमपेज › Marathwada › कोणी काम देता का काम? सुशिक्षित तरुणांचा सवाल

कोणी काम देता का काम? सुशिक्षित तरुणांचा सवाल

Published On: May 11 2018 1:39AM | Last Updated: May 11 2018 12:28AMपूर्णा : प्रतिनिधी

ग्रामीण भागात बहुसंख्य तरुण उच्चशिक्षण घेऊनही नोकरीच्या शोधात फिरत आहेत. तसेच सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत असल्याचे चित्र भविष्यात चिंता निर्माण करणारे आहे. 

पूर्वी ग्रामीण भागात शिक्षणाचे प्रमाण कमी होते. आता हे चित्र बदलले आहे. शिक्षणाचा प्रसार झाल्याने पदवीधरांच्या संख्येत वाढ झाली आहे. पण पदवी घेऊनही तरुणांना नोकरीसाठी अनेकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. या तरुणांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. मात्र पदवी आता नोकरी मिळवून देण्यासाठी उपयोगी ठरत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. नोकरी  मिळत नसल्याने असंख्य

बेकार तरुणांची घरे अक्षरशः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.

अत्याधुनिक यंत्रांचा फटका : आजच्या स्थितीला अत्याधुनिक यंत्राचा वापर वाढला आहे. कमी कालावधीत जास्त उत्पन्न व कमी खर्चात मिळवण्याचा कल आहे.

भरती प्रक्रिया सुरू करावी : शासनाने वाढती बेकारी कमी करण्यासाठी पदवीधरांची संख्या लक्षात घेत जवळपास सर्वच शासकीय कार्यालयात अपुरी कर्मचारी संख्या असताना नवीन नोकर भरती प्रक्रिया सुरु करावी. -शेख गौस शेख महेबूब 

मुद्रालोनसाठी बँकांकडून टाळाटाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुण उद्योग व्यवसायाकडे वळावेत यासाठी मुद्रालोन योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत 50 हजारांपासून 10 लाख रुपयांपर्यत कर्ज देण्याची तरतूद आहे. मात्र पूर्णा शहरातील बँकांकडून या योजनेतून कर्ज देण्यासाठी तरुणांना टाळाटाळ केली जात आहे. याचाही फटका तरुणांना बसत आहे.  - सदाशिव बर्दापुरे