Thu, Apr 25, 2019 17:44होमपेज › Marathwada › तुळजाभवानीला साेलापुरच्या भक्तांनी अर्पण केला २६ तोळ्याचा सोन्याचा हार

तुळजाभवानीला साेलापुरच्या भक्तांनी अर्पण केला २६ तोळ्याचा सोन्याचा हार

Published On: Aug 24 2018 7:15PM | Last Updated: Aug 24 2018 7:12PMतुळजापूर : प्रतिनिधी  

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेस सोलापूरच्या भक्तांनी २६ तोळे सोन्याचा हार अर्पण केला. मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तथा तहसीलदार राहूल पाटील यांच्याकडे हा हार सुपूर्द करण्यात आला. याची मंदिराच्या अभिलेखामध्ये नोंद करण्यात आली आहे. 

पुजारी वीरेंद्र कदम यांनी देवीस हार अर्पण केला. हार दान करणारे हे पाचही भक्त सोलापूरचे व्यापारी आहेत. यावेळी या भक्तांनी आपण भक्तीभावाने हा हार देवीच्या चरणी अर्पण केला असल्याचे सांगितले. तर, आपली नावे कोठेही प्रसिध्द करू नये, अशी विनंती देखील त्यांनी यावेळी केली. मंदीर प्रशासनाच्यावतीने या भक्तांचा देवीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी तहसीलदार तथा मंदीर व्यवस्थापक (प्रशासन) राहुल पाटील, धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी, महंत तुकोजीबुवा, पुजारी संजय सोंजी, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे परमेश्वर, पुजारी अतुल मलबा, सचिन परमेश्वर, शशिकांत कदम, विकास मलबा  आदींची उपस्थिती होती.