Wed, Apr 24, 2019 16:36होमपेज › Marathwada › पालिका कर्मचार्‍यांचे लेखणी बंद आंदोलन

पालिका कर्मचार्‍यांचे लेखणी बंद आंदोलन

Published On: May 29 2018 1:36AM | Last Updated: May 28 2018 11:12PMमाजलगाव : प्रतिनिधी  

येथील नगरपालिकेच्या नियोजन सभापती हनिफा बी शेख बशीर यांचा मुलगा शेख इम्रान याने दोन दिवसांपूर्वी विद्युत अभियंत्यास मारहाण केल्याची ऑनलाइन तक्रार कर्मचार्‍यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे. न. प. कर्मचारी संघटनेच्यावतीने सोमवारी या घटनेच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन करण्यात आले.

माजलगाव नगरपालिकेत 50% महिला नगरसेविका असून त्यांचा कारभार त्यांचे पती व मुलगा किंवा अन्य नातेवाईक चालवतात अशा तक्रारी नेहमीच होतात.  नियोजन सभापती शेख हनिफा बी शेख बशीर यांचा मुलगा इम्रान याने स्वतःच्या वॉर्डात विद्युत दिवे बसवण्याच्या कारणावरून विद्युत अभियंता जोशी यांना दोन दिवसांपूर्वी मारहाण केल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.  सदरील प्रकरणी कर्मचार्‍यांनी पोलिस ठाण्यात ऑनलाइन तक्रार दिली आहे. 

या घटनेचा निषेध म्हणून संघटनेचे अध्यक्ष शिवहार शेटे यांनी सोमवारी काम बंद करण्याचा इशारा मुख्याधिकार्‍यांना दिला होता. त्यानुसार न. प. च्या सर्व विभागातील कर्मचारी यांनी  आंदोलन केले. विद्युत अभियंता जोशी यांना झालेल्या मारहाणप्रकरणी संबंधितांवर योग्य ती कारवाईची मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली. 

आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष शिवहार शेटे,   सूर्यकांत सूर्यवंशी, भगवान कांबळे, प्रल्हाद वक्ते, प्रकाश शिंदे, हमीद बागवान किशोर टाकणखार, विनोद टाकणखर, सुभाष होगे, नरेश राठोड, सुधाकर उजगरे, रमेश भिसे, जावेद इनामदार, विश्वनाथ जोशी, दीक्षा शिरसट, छायाबाई दहिवाल यांच्या सह न.प.चे सर्व विभागातील कर्मचारी   सहभागी झाले होते.

विवेक पोटभरे  यांचा नाही हस्तेक्षेप 

महिला नगरसेवकांचे पती, मुलगा किंवा अन्य नातेवाईक आपण स्वःतच नगरसेवक असल्याच्या अविर्भावात वावरत न. प. कर्मचार्‍यांवर दबाव टाकत असल्याचे प्रकार काहींकडून होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मात्र नगरसेविका मनीषा पोटभरे यांचे पती विवेक पोटभरे  यांनी कोणत्याही प्रकारे ढवळा-ढवळ नगर पालिकेच्या कामात केली नाही. त्यांचा आदर्श इतर नगरसेविका पती व अन्य नातेवाइकांनी घ्यावा असा सूर आंदोलनादरम्यान निघाला होता.