Mon, Nov 19, 2018 14:42होमपेज › Marathwada › काँग्रेस-राष्ट्रवादीचा मोर्चा आज विधानभवनावर धडकणार

काँग्रेस-राष्ट्रवादीचा मोर्चा आज विधानभवनावर धडकणार

Published On: Dec 11 2017 9:59PM | Last Updated: Dec 11 2017 9:59PM

बुकमार्क करा

नागपूर : विशेष प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या आत्महत्या, कर्जमाफीची बनवाबनवी व राज्यातील विविध प्रश्‍न सोडविण्यास भाजप सरकारला आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीने हिवाळी अधिवेशनावर 12 डिसेंबर रोजी मोर्चा धडकणार आहे. काँग्रेस नेत्यांसोबत या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेही करणार आहेत. 

काँग्रेसकडून माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांच्याकडे या मोर्चाची धुरा देण्यात आली आहे. सुमारे दोन लाख लोक या मोर्चात सहभागी होतील, असा दावा अजित पवार व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला.