Wed, Mar 27, 2019 05:58होमपेज › Marathwada › माजलगाव तालुक्यात 213 हेक्टरील पिकांचे नुकसान

माजलगाव तालुक्यात 213 हेक्टरील पिकांचे नुकसान

Published On: Feb 13 2018 2:41AM | Last Updated: Feb 13 2018 2:32AMमाजलगाव : सुभाष नाकलगावकर

काल झालेल्या अवकाळी वादळी वार्‍यासह गाराच्या तडाख्याने माजलगाव तालुक्यातील टाकरवण व तालखेड सर्कल मधील फळ बागेसह अन्य पिकाचे एकूण 450 शेतकर्‍यांचे 213 हेक्टर 20 शेतीचे नुकसान झाले.

एकीकडे मागील तीन वर्षांने दृष्काळाने होरपळून गेलेल्या शेतकर्‍यांना या वर्षी झालेल्या चांगल्या पावसाने मिळालेल्या दिलाशामुळे सुखावलेल्या शेतकर्‍यांना चांगले दिवस आल्याच्या आशेवर असलेल्या शेतकर्‍यासमोर संकटांची मालिकाच उभा राहिली आहे.  बोंड आळी व बोगस  बियाण्यामुळे  शेतकरी मेटाकुटीला आला असताना गेल्या दोन दिवसांपूर्वी गोदावरी नदी काठच्या काळेगावथडी, हिवरा (बु.) डुब्बाथडी, गव्हाणथडी, तालखेड परिसरात जदीद जवळा, मंगरूळ, रामपिंपळगाव या गावाला अवकाळी वादळ वार्‍यासह गारपिटीने झोडपले यात पपई, मोसंबी, हरभरा, गहू, केळी ह्या फळबागा उद्ध्वस्त झाल्या. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने उरला सुरला शेतकरी या अवकाळीने बरबाद झाला आहे. राजकारणी आपल्या राजकारणासाठी शेतकर्‍यांचे शेतावर जाऊन पाहणी करून कोरडे अवसान गाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या भावना शेतकर्‍यांत व्यक्त होत आहे. शेतकर्‍यांचा वालीच उरला नसल्याचे दिसत असताना या झालेल्या पिकाचे नुकसान करण्याची शासकीय यंत्रणा जेवढ्या तत्परतेने करायाला पाहिजे तेवढ्या तप्तरतेने केले जात नाही. 

अधिकारी, पदाधिकार्‍यांकडून पाहणी
शासनाने तत्काळ पंचनामे करण्याच्या आगोदर संबधित मंडळ अधिकारी, तलाठी यांनी पाहणी अहवाल साधर करून जिल्हाधिकारी यांना पाठावला असून या झालेल्या गारपिटीत नुकसानीचे पंचनामे तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांच्या संयुक्तिक पंचनाम्याने शेतकर्‍यांच्या नुकसानिची आकडेवारी निश्‍चित होईल. आज माजलगाव तालुक्यात माजी मंत्री प्रकाश सोळंके, सभापती अशोक डक, जयदत्त नरवडे, जि.प.सदस्य कल्याण आबूज व शिवसेनेचे आपासाहेब जाधव यांनी शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन पिकाची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तत्काळ मदत देण्याची मागणी करण्यात आली. या साठी मंडळ अधिकारी विकास टाकणखार व कोमटवार यांनी या बाबत सर्व तलाठी, कृषी सहायक ग्रामसेवक यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत व यानंतर पुन्हा नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता वाढू शकते.