Wed, Jan 23, 2019 12:56होमपेज › Marathwada › घंटागाडीचे लोकेशन मोबाइलवर उपलब्ध होणार : डॉ. क्षीरसागर

घंटागाडीचे लोकेशन मोबाइलवर उपलब्ध होणार : डॉ. क्षीरसागर

Published On: Jun 08 2018 1:23AM | Last Updated: Jun 08 2018 12:08AMबीड ः प्रतिनिधी 

शहरातील कचरा संकलनाचे काम वेगाने सुरू असून, ठिकठिकाणी घंटागाड्याच्या माध्यमातून ओला आणि सुका कचरा जमा केला जात आहेे. पंधरा दिवसात 80% कचरा जमा करावा. यासाठी शहरातील नागरिकांना 100 मी. अंतरात आलेली ही घंटागाडी व तीचे लोकेशन बीडमध्ये उपलब्ध करून देण्याची सुविधा लवकरच दिली जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली आहे.

नगर पालिकेत नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी सर्व विभाग प्रमुख यांची गुरुवारी (दि.7)आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी स्वच्छता विभागाला सूचना देताना सांगितले की, स्वच्छता मोहिमे दरम्यान दररोज घंटागाड्यांचे योग्य नियोजन करून येत्या पंधरा दिवसांत 80% कचरा संकलीत करण्याचे उद्दिष्टे ठेवावीत. रस्त्यावर कचरा टाकणार्‍वर तातडीने कारवाही करून 500 रुपये दंड आकारावा तसेच परवानगी शिवाय रस्ते खोदणार्‍यांवर ही कारवाई करण्यात यावी, खाजगी रुग्णालयाचा कचरा संकलीत करण्याचे काम ज्याच्याकडे आहे.

त्याने तो तातडीने संकलीत करावा, याच बरोबर स्वच्छता मोहिमेचे काम पारदर्शकपणे व्हावे यासाठी नाशिक प्रमाणे बीड शहरातही प्रत्येक घंटागाड्यासाठी जीपीएस प्रणाली बसवून घंटागाड्या कोठे कोठे जातात याची माहिती ठेवावी, असे क्षीरसागर यांनी सांगितले.  यावेळी मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर, उपमुख्याधिकारी साठे, सभापती विकास जोगदंड, शेख शाकेर, गटनेते सादेक जम्मा आदींसह संबंधीत विभागप्रमुख, कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.

येत्या काही दिवसांतच प्रत्येक वॉर्डात आणि गल्लीत घंटागाडी आल्याचे संकेत रहिवाश्यांना मिळावेत त्यासाठी एसएमएस सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. 100 मी. अंतरात आलेल्या घंटागाडीची माहिती आता प्रत्येक मोबाइलवर दिली जाणार आहे. स्वच्छता मोहिमेसाठी 50 वाढीव कर्मचारी घेण्यात येणार असून, स्वच्छता विभागाला लागणार्‍या साहित्याची खरेदी ही तातडीने करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या तसेच 31 मार्च 2019 पर्यंत संपूर्ण बीड शहर कचरा व कुंडीम्ाुक्त करण्याचा संकल्प असून, यासाठी विभागप्रमुख आणि कर्मचार्‍यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केले.