Thu, Jul 18, 2019 14:32होमपेज › Marathwada › उन्हाचा पारा वाढला, बाजारपेठेत ग्राहकी मंदावली

उन्हाचा पारा वाढला, बाजारपेठेत ग्राहकी मंदावली

Published On: Apr 22 2018 1:12AM | Last Updated: Apr 21 2018 10:32PMपरळी : प्रतिनिधी

उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून तापमान 33 सेल्सियस अंशांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे याचा परिणाम परळी शहरातील बाजारपेठेवरही जाणवत असून मार्च महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासूनच तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. 

हवामान खात्यानेही यंदा तापमान जास्त असल्याचा अंदाज व्यक्त केल्याने उन्हाळ्यात नागरिकांना उष्मघातापासून वाचण्यासाठी आपल्या दिनचर्येत बदल करावा लागणार आहे. लग्नसराईचा महिना असल्यानंतरही उन्हाच्या वाढत्या तडाख्याने दुपारी 12 ते वाजेपर्यंत नागरिक खरेदी टाळत आहेत. खरेदी करण्यासाठी नागरिक एकतर   11 पर्यंत अथवा सायंकाळी नंतर रात्री उशिरापर्यंतच्या वेळेत खरेदी करायला पसंती दर्शवत आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा पारा 33 अंश सेल्सियसच्या वर गेला आहे.  लग्नसराईत विविध भेटवस्तू देण्यासाठी नागरिकांची बाजारपेठेत    सायंकाळी  गर्दी पाहावयास मिळत आहे. 

सोन्याची खरेदीसाठी सायंकाळच्याच वेळेला पसंती दर्शविली आहे. कूलर, फ्रिज, लग्नाचे कपडे तसेच किराणा साहित्य खरेदीवर विशेष जोर आहे. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढण्याचे संकेत आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्याचा शेवट व पूर्ण मे महिना नागरिकांना, व्यापार्‍यांना कठीण जाणार असल्याचे संकेत आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी स्कार्फ, दुपट्टा पांढर्‍या कपड्यांचा वापर करत आहेत. वाढत्या उन्हाचा फटका व्यापारी वर्गालाही बसू लागला आहे. 

Tags :  Marathwada, heat, dissipated, subscribing, market