Tue, Jan 22, 2019 12:02होमपेज › Marathwada › पलंगावर झोपल्याने डोके फोडले

पलंगावर झोपल्याने डोके फोडले

Published On: May 16 2018 1:38AM | Last Updated: May 16 2018 1:38AMगंगाखेड : प्रतिनिधीं

आखाड्यावरील पलंगावर झोपल्याच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करून दगडाने मारून डोके फोडल्याची घटना 13 मे रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास तालुक्यातील रुमना (जवळा) शेतशिवारात घडली. या प्रकरणी 14 मे रोजी रात्री साडेआठ वाजता गंगाखेड पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तालुक्यातील  रुमना (ज.) येथील विश्वास पिराजी पकाने (वय 28 वर्षे) हे 13 मे रोजी दुपारी गावातील जगन्नाथ कदम यांच्या शेतआखाड्यावरील पलंगावर झोपले होते. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास उठून ते गावाकडे जाण्यासाठी निघाले असता, त्यावेळी तिथे गावातील काहीजण आले. त्यापैकी भागवत कोंडिबा कदम याने आखाड्यावरील पलंगावर झोपल्याचे पाहून गावाकडे जाण्यासाठी निघालेल्या विश्वास पकाने यास जातीवाचक शिवीगाळ करून रोडवरील दगड हातात घेऊन डोक्यात मारून जखमी केले. यावेळी आखाड्यावर असलेल्या गावातील इतर लोकांनी भांडण सोडवले.  विश्वास पिराजी पकाने यांनी रात्री साडेआठ वाजता भागवत कोंडिबा कदम (रा.रुमना (ज.) यांच्याविरुध्द  तक्रार दिली.