Thu, Jul 18, 2019 00:03होमपेज › Marathwada › मुलीने पळून जावून लग्न केल्याने पित्याने संपवले जीवन

मुलीने पळून जावून लग्न केल्याने पित्याने संपवले जीवन

Published On: Apr 22 2018 6:38PM | Last Updated: Apr 22 2018 6:27PMनंदुरबार : प्रतिनिधी 

मुलीने पळून जावून लग्न केल्याने जन्मदात्या पित्याने विष पिवून आपले जीवन संपवले. अक्कलकुवा तालुक्यातील आमली गावात ही दुर्देवी घटना घडली.  कुंवरसिंग बोट्या पाडवी (वय -60) असे या मृत पित्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अक्कलकुवा तालुक्यातील आमली गावात मुलीने आपल्या नात्यातीलच मुलाशी लग्न केल्याच्या रागातून पित्याने विष प्राषण करून आपले जीवन संपवल्याची घटना घडली. कुंवरसिंग पाडवी हे शनिवारी रात्री विषारी औषध प्राशन करून मृत अवस्थेत आढळून आले. याबाबत जयसिंग पाडवी या तरुणाने अक्कलकुवा पोलिसांना यांची माहिती दिली. या घटनेचा पोलिस अधिक तपास करीत आहेत.