Mon, Jun 24, 2019 21:40होमपेज › Marathwada › उष्णतेच्या लाटेचा हवामान खात्याचा अंदाज  

उष्णतेच्या लाटेचा हवामान खात्याचा अंदाज  

Published On: Apr 07 2018 1:38AM | Last Updated: Apr 07 2018 12:38AMबीड : प्रतिनिधी

 हवामान खात्याने या वर्षी देशभरातील विविध भागांमध्ये उष्णतेची लाट लवकरच येण्याचा अंदाज वर्तविला आहे.  उष्णतेच्या लाटेमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी नागरिकांनी पुढीलप्रमाणे काळजी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी गुरुवारी दिल्या आहेत. तीव्र उन्हात दुपारी 12.00 ते 3.00 च्या दरम्यान बाहेर पडणे टाळावे असेही सांगण्यात आले आहेत.

उष्णतेच्या लाटेमुळे आजारी पडलेल्या व्यक्तीला एखाद्या थंड जागी ठेवावे,  शरीराचे तापमान खाली आणण्याचा प्रयत्न करावा, ओल्या कपड्याने अंग पुसावे,  ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करून उपचार सुरू करावे आदी सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच  कर्तव्य म्हणून जिल्ह्यामधील मंदिरे, सार्वजनिक इमारती, हॉल, उद्याने इत्यादी दुपारीसुध्दा उघडे ठेवावे. जेणेकरून लोकांना दुपारच्या वेळेस येथे आश्रय घेता येईल.  या काळात रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे इत्यादी ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

उष्णतेच्या बचावसंदर्भात होडिर्र्ंग्ज, भित्तिपत्रके, पॉम्प्लेट यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा. जिल्हा व तालुका तसेच ग्रामीण भागात उक्त सूचनांचा प्रचार प्रसार होण्यासाठी होडिर्र्ंग्ज तयार करून वर्दळीच्या ठिकाणी चित्रपटगृह, शाळा, महाविद्यालये, शासकीय निमशासकीय कार्यालय, दवाखाने इत्यादी ठिकाणी भित्तिपत्रके लावावीत. आठवडी बाजारात पॉम्प्लेट वाटावीत. प्रसार माध्यमाद्वारे सोशल मीडिया, रेडीओद्वारे उष्णतेबाबत काळजी घेण्याची प्रसिध्दी देण्यात यावी, असेही जिल्हाधिकार्‍यांनी प्रसिध्दिपत्रकाद्वारे कळविले आहे.निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना उष्णतेच्या लाटेसाठी नोडल अधिकारी म्हणून व तालुकास्तरावर तहसीलदार नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. उष्णतेच्या लाटेची पूर्व अनुमानाच्या सूचना त्यांनी द्याव्यात तसेच उपाययोजनेची जबाबदारी त्यांनी पार पाडावी, उष्णतेबाबत लाट आल्यास काय करावे काय करू नये यासाठी जनजागृती अभियान राबवावे असे निर्देशही जिल्हाधिकार्‍यांनी कळविले आहे.

Tags : Marathwada forecast, heat, wave, weather department