Wed, Jan 23, 2019 16:55होमपेज › Marathwada › मराठवाड्यातील पहिले यकृत प्रत्यारोपण यशस्वी

मराठवाड्यातील पहिले यकृत प्रत्यारोपण यशस्वी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद ः प्रतिनिधी

औरंगाबाद येथील एन-2 ठाकरे नगरातील रहिवासी दिनेश असावा (55) हे ब्रेन हॅमरेजमुळे ब्रेन डेड झाल्यानंतर नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. यामुळे मराठवाड्यातील पहिले यकृत प्रत्यारोपण एमजीएम रुग्णालयात यशस्वी ठरले. जवळपास 12 ते 13 तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. सुरत येथील 59 वर्षीय महिलेवर यकृत प्रत्यारोपित करण्यात आल्याची माहिती एमजीएमचे डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी दिली. दिनेश असावा हे गुरुवारी सायंकाळी किराणा दुकानात काम करताना पडले होते. जवळच्या
रुग्णालयात नातेवाईकांनी त्यांना दाखल केले होते. असावा यांना सोमेश्‍वर, शैलेश आणि पवन अशी तीन मुले व अनुराधा, प्रज्ञा, स्नेहा या सुना आहेत. सर्वजण सीए आहेत. दिनेश असावा गंभीर असल्याने त्यांनामोठ्या रुग्णालयात हलविण्यात आले. 12 तासांच्या उपचारानंतर शुक्रवारी (दि. 24) सकाळी 11 वाजता डॉक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घोषित केले. कुटुंबीयांनी अवयवदानाची इच्छा व्यक्त केल्यानंतर पुढील सूत्रे हलली. त्यांना अवयव रिट्रायव्हलची परवानगी असलेल्या कमलनयन बजाज रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाच्या ब्रेनडेड समितीने त्यांची संपूर्ण तपासणी केली. त्यानंतर 6 तासांनी दुसरी तपासणी करण्यात आली. यानंतर औपचारिकता म्हणून असावा यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले.

दरम्यान, विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. सुधीर कुलकर्णी यांना ब्रेनडेडची माहिती देण्यात आली. यानंतर पुढील सूत्रे त्यांनी हलवली. मुंबई-पुण्यासह देशातील सर्व प्रत्यारोपण करत असलेल्या रुग्णालयांना कळवण्यात आले. हृदय चेन्नईला पाठवण्यासाठी हालचाली झाल्या. मात्र, तेथे रुग्णाची स्थिती नसल्याने हृदयदान होऊ शकले नाही.

यकृत एमजीएम रुग्णालयात पाठविण्यात आले. दोन्ही किडन्या व डोळेही दान करण्यात आले.