होमपेज › Marathwada › कर्जमाफ ी योजनेला दोन महिने मुदतवाढ देणार

कर्जमाफ ी योजनेला दोन महिने मुदतवाढ देणार

Published On: Jun 29 2018 12:56AM | Last Updated: Jun 29 2018 12:20AMबीड : प्रतिनिधी

 गरजू शेतकर्‍याला छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा. यासाठी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील त्यांचे सर्व सहकारी सतत कार्यरत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविण्याकरिता आणखी दोन महिने मुदतवाढ मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन, खारभूमी मंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी (दि.28) केले.

जिल्हा नियोजन समिती सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, पीक विमा कर्ज यासंबधी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा उपनिबंधक शिवाजी बडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  चपळे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय चव्हाण हे उपस्थित होते. दिवाकर रावते  म्हणाले की, समाजातील शेतकरी आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचा घटक आहे. 

त्याचे जीवन सुसह्य होईल, यासाठी सर्वांनी सकारात्मक पवित्रा घेऊन त्याच्यासाठी एकत्रित येऊन झटून काम केले पाहिजे. या शासनात सरकार, प्रशासन आणि शेतकरी यांच्यात संवाद साधला जातो, ही सकारात्मक बाब आहे. 

त्यानुसार शासकीय अधिकार्‍यांनी, बँकर्सनी, ग्रामसेवक, तलाठी यांनी शेतकर्‍यांविषयी संवेदनशीलता जागृत ठेवून त्यानुसार प्रत्येक शेतकर्‍याला   कर्जमाफीचा, योजनांचा पुरेपूर लाभ मिळेल.