बीड : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीत बीडसह माजलगाव, परळी, केज विधानसभा मतदारसघांतुनही एमआयएम सक्षम उमेदवार देऊन निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची माहिती एमआयएमचे शेख निजाम यांनी दिली. एमआयएमचा 60 वा वर्धापनदिन जिल्हा कार्यालयात साजरा करण्यात आला.
यावेळी एमआयएम जिल्हाध्यक्ष शेख निजाम म्हणाले की आगामी विधानसभा निवडणुकीत बीडसह माजलगाव, परळी व केज या चार मतदारसघांतून निवडणूक लढण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे प्रस्ताव ठेवला. तो प्रस्ताव त्यांनी मान्य केला आहे. यामुळे बीड, माजलगाव, परळी, केज या मतदारसघांत एमआयएम सर्व ताकदीने निवडणुकीसाठी उतरणार आहे. यामुळे सर्व पदधिकार्यांनी कामाला लागावे असे आवाहन जिल्हाअध्यक्ष शेख निजाम यांनी केले.
यावेळी बीड तालुकाध्यक्ष रफीक नौशाद, अंबेजोगाई तालुकाध्यक्ष रमीज भाई, माजलगाव तालुकाध्यक्ष शेख ईद्रीस पाशा, जिल्हा उपाध्यक्ष हाफेज अश्फाक, जिल्हा सरचिटनीस अय्युब पठाण, जिल्हा प्रवक्ता हॅरीसन रेड्डी, नगरसेवक शेख अमर, नगरसेवक मुन्ना इनामदार, मोमीन जुबेर आदी उपस्थित होते.