होमपेज › Marathwada › अस्मितेच्या लढाया नको; आता अस्तित्वाची लढाई लढायचीय    

अस्मितेच्या लढाया नको; आता अस्तित्वाची लढाई लढायचीय    

Published On: Jan 29 2018 1:41AM | Last Updated: Jan 29 2018 12:18AMबीड : प्रतिनिधी

‘आजवर लढ़लोत जातीसाठी आता लढूया पोटासाठी’ अशा घोषणांमध्ये बीड येथील आंबेडकर भवन येथे महाराष्ट्रातील पहिली सुशिक्षित बेरोजगार परिषद संपन्न झाली. सुराज्य सेना अन् अभिव्यक्त ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेला शहरातील सुशिक्षित बेरोजगारांची उपस्थिती होती. अस्मितेच्या लढाया बस्स करा आता अस्तित्वाची लढाई लढा असे आवाहन यावेळी सुभाष वारे यांनी केले.

सुभाष वारे म्हणाले, की आजघडीला युवकांना अस्मितेच्या लढाया लढवण्यास पुढे केले जाते, मात्र त्यांच्या अस्तित्वाच्या रोजगाराकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. युवकांनो अस्मितेच्या लढाया बस्स करा आता अस्तित्वाची लढाई लढा, असे आवाहन त्यांनी केले. सुराज्य सेनेचे फारूख अहमद यांनी रोजगार अन् नोकरी हा आपला प्रश्‍न असून राजकीय संघटना आपल्याला जातीधर्माच्या अन् आरक्षणाच्या नावाखाली भरकवटत असल्याचे मत मांडले.

यावेळी मोहन गुंड, नागेश मिठे, कांबळे, मोहन जाधव, रोहिदास जाधव आदींची उपस्थिती होती. परिषदेचे सूत्रसंचालन रविराज बडे, अशोक येडे तर आभार अभिव्यक्त ग्रुपचे धनंजय गुंदेकर यांनी केले. परिषदेसाठी वचिष्ट बडे, प्रशांत डोरले, नितीन राऊत, दत्ता प्रभाळे, रवी घायाळ, सुफियान मणियार, चांगदेव गित्ते, संग्राम धनवे, किशोर गिराम, विनोद कुटे, अजित वावरे, दीपक डावकर, राज बडे, अकबर अत्तर, गणेश तांबे, इम्रान शहा, नईम पठाण, रवी शिंदे, संभाजी सुर्वे आदींनी परिश्रम घेतले.