होमपेज › Marathwada › मराठा आरक्षण मिळेपर्यंत शाळेत न जाण्याचा निर्धार

मराठा आरक्षण मिळेपर्यंत शाळेत न जाण्याचा निर्धार

Published On: Aug 05 2018 1:30AM | Last Updated: Aug 04 2018 11:20PMलिंबा :  प्रतिनिधी

मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शाळेची पायरीही चढणार नाही असा निर्धार विद्यार्थी व पालकांनी केला आहे. पाथरी तालुक्यातील कानसूर येथील जि.प. प्रा. शाळेच्या चिमुकल्यांनी गावत सकाळी प्रभातफेरी काढून शासनाविरुध्द घोषणाबाजी करत निषेध केला. 

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत शाळेची पायरी चढणार नाही, असा निर्धार सर्व मराठा विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी केला आहे. त्या संदर्भात शाळेतील शिक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. त्यानंतर तहसीलदार व गटशिक्षण अधिकार्‍यांना निवेदन देण्यात येणार आहे.

या संदर्भात सर्व समाजातील विद्यार्थी व पालकांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी पाठिंबा दर्शविला आहे.  विद्यार्थ्यांनी आरक्षण हक्कासाठी गावातून मिरवणूकही काढली. या मिरवणुकीत विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.