Sun, May 26, 2019 00:51होमपेज › Marathwada › गरिबांच्या फ्रीजला मागणी 

गरिबांच्या फ्रीजला मागणी 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

आर्वीः जालिंदर नन्नवरे 

 उन्हाचा पारा चढण्यास सुरुवात झाली असून गरिबाचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणार्‍या माठाची मागणी वाढत आहे. कुंभार व्यवसायिकांच्या वर्षभर मेहनतीनंतर उन्हाळ्यात माठांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. शिरुर तालुक्या त ठिकठिकाणी माठ विक्रीसाठी दुकाने थाटली असून खरेदीचा जोर वाढत आहे. 

उन्हाळयात माठाची मागणी मोठी असते. मात्र, बदलत्या काळानुसार ठंडगार पाण्याच्या माठाची जागा मिनरल वॉटरने घेतली आहे. त्यामुळे कुंभार व्यवसायिकांवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. परंतु आजही थंड पाण्यासाठी माठ वापरला जातो.  कुंभार व्यावसिकांचा कमाईचा सिझन म्हणजे उन्हाळाच असतो. चिखलात पाय तुडवत, फिरत्या चाकावर मातीला आकार देऊन कुंभार माठ घडवतो. त्यानंतर तासंतास भट्टीवर शेकल्यानंतर खर्‍या अर्थाने गरिबांचा फ्रीज असलेला माठ आकारास येतो. 

Tags : Marthwada, Marathwada News, demand,  Mathh,  increasing


  •