Tue, Feb 19, 2019 12:06होमपेज › Marathwada › हिंगोली : विंचू चावल्याने सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू

हिंगोली : विंचू चावल्याने सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू

Published On: Jul 14 2018 6:56PM | Last Updated: Jul 14 2018 7:37PMहिंगोली : प्रतिनिधी

घरच्या अंगणात खेळत असतानाच सहा वर्षीय बालिकेच्या हाताला विंचू चावल्याने दुर्देवी मृत्यू झाला. वैष्णवी डांगे असे या बालिकेचे नाव आहे. या दुर्देवी घटनेमुळे वडद परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, विजय डांगे हे आपल्या कुटुंबियासोबत वडद येथे राहतात. त्यांना वैष्णवी ही सहा वर्षाची मुलगी आहे. सकाळच्या सुमारास वैष्णवी ही घरच्या अंगणात खेळत होती. याचवेळी तिच्या हाताला विंचूने डंक केला. असह्य वेदना झाल्याने ती मोठमोठ्याने रडू लागली.  यावेळी तिच्या आईने धावत येत तिला जवळ घेतले. आईने तिला का रडत आहेस विचारल्यानंतर तिने आपल्या हाताला विंचू चावल्याचे सांगितले. 

हे समजताच घरच्यांनी तिला तत्काळ हिंगोली येथील शासकीय रूग्णालयात नेले. मात्र, उपचारदरम्यानच दुपारच्या सुमारास तिचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी बालरोग तज्ञ डॉ नितीन अग्रवाल यांनी विंचू अती विषारी असल्यामुळे वैष्णवीचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले