होमपेज › Marathwada › बियाणे खरेदीसाठी आलेल्या शेतकर्याचा ह्रदय् विकाराने मृत्यू

बियाणे खरेदीसाठी आलेल्या शेतकर्याचा ह्रदय् विकाराने मृत्यू

Published On: Jun 11 2018 2:32PM | Last Updated: Jun 11 2018 2:32PMमराठवाडा: हिमायतनगर प्रतिनिधी

पावसाळी हंगात असल्याकारणाने शेतकर्याची  सध्या बि-बियाणे खरेदी करण्यासाठी धावपळ सुरू असुन  शहरात खत- बियाणे खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्याचा ह्रदय् विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना  दि.10 जून रोजी घडली. 

पुजांराम आडेलू असे या मृत शेतकऱ्याचे नाव असुन त्याचे वय ६० वर्षे असे आहे. पळसपूर येथीला हा शेतकरी शहरात खत - बियाणे खरेदी करण्यासाठी गेला असाता त्याला अचानक  ह्रदय् विकाराच्या झटका आला आणि तो जागीच कोसळला. नागरिकांनी  हे पाहताच त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची बाब डॉ. राठोड यांनी सांगितली. त्यांच्या पश्चात पत्नी,तिन मुल, एक मुलगी, सुना नातु पंतु असा परिवार आहे .