Tue, Aug 20, 2019 04:58होमपेज › Marathwada › शेतकर्‍यांना ३१ मार्च  असणार अंतिम मुदत

शेतकर्‍यांना ३१ मार्च  असणार अंतिम मुदत

Published On: Mar 06 2018 12:54AM | Last Updated: Mar 06 2018 12:51AMपरभणी : प्रतिनिधी

जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत 24 जुलै ते 22 सप्टेंबर 2017 पर्यंत एकूण 1 लाख 80 हजार 940 शेतकर्‍यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. या कालावधीत अनेक शेतकर्‍यांना अर्ज दाखल करता आले नाही. अशा शेतकर्‍यांचा विचार करून त्यांनाही लाभ देण्याच्या हेतूने शासनाने या वंचित शेतकर्‍यांना ऑनलाइन अर्ज शासनाचया कर्जमाफीसाठी असलेल्या पोर्टलवर दाखल करण्यासाठी 31 मार्च ही अंतिम तारीख दिली आहे. 

परभणी जिल्ह्यात शासनाच्या कर्जमाफी योजनेच्या लाभापासून अनेक शेतकरी आजही वंचित राहिलेले आहेत. तसेच बर्‍याच शेतकर्‍यांना ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतरही आपणास कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे की नाही याची माहिती मिळाली नाही. तसेच ज्या शेतकर्‍यांना शासनाच्या कर्जमाफी योजनेकरिता जुलै ते सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज दाखल करता आले नाही त्यांना लाभ देण्याचा विचार शासनाने केला आहे.

सदरील वंचित शेतकर्‍यांनी 31 मार्चपर्यंत जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रामार्फत पुन्हा एकदा ऑनलाइन अर्ज दाखल करावा अन्यथा अर्ज दाखल करण्यासाठी सीएसएमएसएस डॉट एमएएचएओएनएलआयएनई डॉट जीओव्ही डॉट आयएन या पोर्टलवर माहिती भरावी, असेे आवाहन जिल्हाधिकारी पी.शिवाशंकर, जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी राम खरटमल, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.जी. जाधव यांनी केले आहे.